Wednesday, June 17, 2026
Latest NewsMAHARASHTRA

आता फक्त भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचा झेंडा फडकणार -चंद्रकांत पाटील

कोल्हापूर : राज्यातील 16 जिल्ह्यांमधील 51 तालुक्यांतील 608 ग्रामपंचायतींसाठी मतमोजणी चे निकाल लागत आहेत. भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाचा सुद्धा मोठा विजय होताना दिसत आहे. 
यावर ग्रामपंचायत निवडणुका असुदेत किंवा मुंबई महानगरपालिका निवडणूक आता फक्त भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेचाच झेंडा फडकणार, असे वक्तव्य उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरातील 70 हुन अधिक अंगणवाडींना आवश्यक साहित्य आणि पोषण आहार वाटण्यात आले. तेव्हा ते माध्यमांशी बोलत होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading