बारामतीत केंद्रीय मंत्री येणार म्हणून सुप्रिया सुळेघरोघरी फिरत आहेत -राम शिंदे
पुणे: बारामती लोकसभा मतदार संघ सन २०२४ मध्ये जिंकण्याच्या दृष्टीने भारतीय जनता पक्षाने आराखडा तयार केला आहे.राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या आता मतदारसंघात सारखे फिरायला लागले आहेत लोकांच्या गाठीभेटी घेत आहेत. सुप्रिया सुळे दररोज प्रसार माध्यमांशी संवाद साधत आहे.
त्यामुळे विरोधी पक्ष सतत टीका करत आहेत. त्यावर मंत्री येण्याच्या आधी सुप्रिया सुळे घाबरल्या आहेत.
मंत्री येणार म्हणून घरोघरी फिरत आहेत. असा टोला भाजपचे आमदार राम शिंदे यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत सुप्रिया सुळे यांना लगावला.
बारामती आपल्या ताब्यातून जाऊ नये म्हणून सुप्रिया सुळे, बारामती मतदारसंघ पिंजून काढत त्यावर राम शिंदे म्हणाले,अडीच वर्षात मदादरसंघात न फिरलेल्या खासदार आता फिरू लागले आहेत. अशी टीका राम शिंदे सुप्रिया सुळे यांच्यावर केली.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या भाजपच्या जेष्ठ नेत्या आहेत. त्यामुळे विरोधी पक्ष तरुण पिढीला हे जमले नाही म्हणून भाजप ज्येष्ठ नेत्यांना पाठवत आहे. अशी टीका करत आहेत. त्यावर राम शिंदे म्हणाले,भाजपचा ३० वर्षे कार्यकर्ता बारामती मतदारसंघात जाणार आहे.विरोधक कोण याचा विचार नाही.दिलेली जबाबदारी पार पाडणार. असे राम शिंदे म्हणाले.
बारामती मतदारसंघात आम्ही काय काम केले. हे तुम्ही बारामतीत आल्यावर आम्ही दाखवू. असे शरद पवार, अजित पवार ,व सुप्रिया सुळे म्हणत आहेत. त्यावर राम शिंदे म्हणाले,बारामतीचा विकास झालेला नाही.४० गावांना पाणी नाही.
रस्ते वाईट अवस्था ,विकासाचा दावा चुकीचा, असे प्रश्न बारामती नागरिकांना सतवत आहेत. त्यावर राम शिंदे म्हणाले,त्यांनी समोरासमोर लढायची तयारी ठेवावी.सामान्य जनता उत्तर देईल. असे राम शिंदे म्हणाले.
राम शिंदे म्हणाले, निर्मला सीतारामन यांच्या बारामती दौऱ्या वेळी २१कार्यक्रमांचे नियोजन केले आहे.खडकबासला, भोर, पुरंदर, दौंड, इंदापूर, बारामती येथे 21 22 23 24 सप्टेंबरला ते नागरिकांची संवाद साधनार आहेत.पुण्यात २४ तारखेला अधिकारी आढावा बैठक येणार आहेत असे राम शिंदे म्हणाले.
बारामती लोकसभा मतदारसंघातील धनगर समाजाच्या लोकांचे भरपूर प्रश्न प्रलंबित आहेत. त्यावर पत्रकारांनी राम शिंदे यांना विचारले की धनगरांचे प्रश्न सोडवण्यासाठी सितारामन काय प्रयत्न करणार. त्यावर राम शिंदे म्हणाले,धनगर समाजाची घटनेत आरक्षण निर्णय घटनेशी संबंधित असल्याने केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे. असे राम शिंदे म्हणाले.
