Friday, September 11, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

राजकीय दबावामुळे वेदान्ता हा प्रकल्प गुजरातला गेला – जयंत पाटील

पुणे:वेदान्ता फ़ॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याने राज्यातील विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहे.त्यानंतर शिंदे फडणवीस सरकार विरोधात राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून ठिकठिकाणी आंदोलन देखील करण्यात आले. वेदान्ता फ़ॉक्सकॉन प्रकल्प राज्य बाहेर जाण्यास महाविकास आघाडी सरकारच जबाबदार असल्याचे शिंदे फडणवीस सरकारकडून सांगितले जात आहे.

.आज पुण्यात एका कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांना वेदान्ता फ़ॉक्सकॉन प्रकल्प राज्य बाहेर जाण्यास महाविकास आघाडी सरकारच जबाबदार असल्याचे शिंदे फडणवीस सरकारकडून सांगितले जात आहे.त्यावर हे धादांत खोट असून एकनाथ शिंदे यांनी एवढ्यात वेदान्ता फ़ॉक्सकॉन कंपनीला पत्र पाठवल होते. दोन दिवसात एमएयू करू आणि मंत्रिमंडळा समोर एमएयूचा प्रस्ताव मांडला जाईल. त्यामुळे सर्व काही ट्रॅकवर होत.पण अचानक तो प्रकल्प गेला आहे. हा प्रकल्प जाण्यास राज्य सरकारच दोषी असून दुसर कोणी नाही.राजकीय दबावामुळे हा प्रकल्प गुजरातला गेला आहे.यामध्ये आमचा काही संबंध नाही.आम्ही तो महाराष्ट्रातच यावा,यासाठी प्रयत्न केले आहेत.आता प्रकल्प गेल्यानंतर हे करू ते करू याला काही अर्थ नसतो.अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला आहे.
जयंत पाटील हे डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्टस् असोसिएशनतर्फे आयोजीत दोन दिवसीय वार्षिक साखर परिषदेचे उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित होते.तेव्हा जयंत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
दसरा मेळाव्यावरून राजकारण होताना दिसत आहे.त्यावर जयंत पाटील म्हणाले की,बाळासाहेब ठाकरे यांच्या पासून दसरा मेळावा आयोजित केला जात आहे.ती परंपरा उद्धव ठाकरे यांनी पुढे चालवली आहे आणि ती चालू राहील.ती परंपरा सुरू रहावी.हेच महाराष्ट्राच्या मनात आहे.तसेच शिवतीर्थावरच दसरा मेळाव्याची परंपरा असून त्यासाठी उद्धव ठाकरेंना ती मिळायला हवी आहे.अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली.
राज ठाकरे सुमारे १५ वर्षांनंतर विदर्भाच्या दौऱ्यावर आले आहेत. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर २००५ मध्ये राज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर आले होते. त्यावर विविध नेत्यांनी प्रतिक्रिया सुद्धा दिल्या आहेत. त्यावर जयंत पाटील म्हणाले, स्वतःच्या पक्षाचे राज ठाकरेकाम करत आहेत. चांगले आहे .असे जयंत पाटील म्हणाले

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading