Tuesday, April 7, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

टॉप सिक्युरिटी घोटाळा: शिवसेना सोडल्याने सरनाईक यांना क्लिन चिट मिळाली – जयंत पाटील

पुणे : टॉप्स समूह’ गैरव्यवहाराशी संबंधित तपास बंद करण्याचा आर्थिक गुन्हे विभागाचा (ईओडब्ल्यू) अहवाल महानगर दंडाधिकाऱ्यांनी स्वीकारल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील ठाणे येथील आमदार प्रताप सरनाईक यांनाही ‘ईडी’ चौकशी प्रकरणात दिलासा मिळाला आहे. त्यावर पक्ष सोडल्याने प्रताप सरनाईक याना क्लिन चिट मिळाली . ईडीने काही महिन्यापूर्वी कारवाई केली आता त्यांना क्लिन चिट दिली. असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील हे पुण्यात पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

राष्ट्रवादीतील काही आमदार आमच्या संपर्कात आहेत असा दावा शिंदे करत आहे. त्यावर जयंत पाटील म्हणाले,त्यांना विचारलं पाहिजे एनसीपीचे कोण आमदार संपर्कात आहेत. असा सवाल जयंत पाटील यांनी शिंदे गटाला विचारला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या जन्मदिनी नामिबियातून आणलेल्या आठ चित्त्यांना मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये विशेष बंदोबस्तात सोडले आहे. त्यामुळे विरोधी पक्षाने मोदी यांच्यावर टीका केली आहे. त्यावर जयंत पाटील म्हणाले,मोदीना शुभेच्छा चित्ते भारतात नव्हते हा वेगळा योगायोग. असे जयंत पाटील म्हणाले.
दोन-तीन महिने झाले तरी अजून या शिंदे व भाजप सरकारला प्रत्येक जिल्ह्याला पालकमंत्री देता आला नाही. या आमदारांमध्ये एकमत नाही म्हणून प्रत्येक जिल्ह्याला पालकमंत्री अजून आला गेला नाही. त्यामुळे विरोधी पक्ष सतत टीका करत आहेत. त्यावर पाटील म्हणाले,मतभिन्नता असलं त्यामुळे पालकमंत्री मिळेनात सरकारला अशी टीका जयंत पाटील यांनी शिंदे व भाजप सरकारवर केली.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची सध्या देशभरात भारत जोडो यात्रा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस यात्रेत सहभागी होणार का. असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. त्यावर जयंत पाटील म्हणाले,राहुल गांधी रॅली जोर धरते त्यांना लोकांचा पाठींबा मिळत आहे,आमचा अजून पाठींबा यावर चर्चा झाली नाही अजून पक्षात. असे जयंत पाटील म्हणाले.
स्थानिक स्वराज्य निवडणुका या कधी असा प्रश्न स्थानिक स्तरावरचे नेते विचारत आहेत. त्यावर जयंत पाटील म्हणाले,स्थानिक स्वराज संस्था निवडणूक घेण्यास सरकार घाबरले आहे. अशी टीका जयंत पाटील यांनी या सरकारवर केली. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी एकत्र लढणार का .या प्रश्नावर जयंत पाटील म्हणाले, स्थानिक स्तरावरचे नेते एकत्रित लढण्यावर विचार करतील. असे जयंत पाटील म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading