केंद्रीय मंत्री रेणुका सिंग यांनी घेतले छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन
पुणे:शिरुर लोकसभा प्रवास योजना | केंद्रीय मंत्री मा.ना. रेणुकाजी सिंह आदिवासी राज्यमंत्री भारत सरकार या श्री क्षेत्र वढु बु येथे धर्मवीर छञपती संभाजी महाराजांचे दर्शन घेतले ह्या संपुर्ण दौऱ्याची जबाबदारी भारतीय जनता पार्टी कडून स्थानिक नेतृत्व ॲड. संजय सावंत पाटील – जिल्हाध्यक्ष भाजपा पुणे जिल्हा कायदा आघाडी यांच्याकडे देण्यात आली होती. मंत्री महोदया आल्यानंतर महिलांच्या वतीने सौ. स्वाती संजय सावंत यांनी औक्षण व सत्कार केला, समाधी स्थळाची संपुर्ण माहिती दिली, धर्मवीर संभाजी महाराज विकास आराखडा बाबत समस्त ग्रामस्थांना विचारात घेण्यात यावे म्हणून मंत्री महोदयांना विनंती केली, महाराष्ट्र शासनाने आराखडा संदर्भात घेतलेला निर्णय व अजुन शासकीय मदतीच्या संदर्भात असलेली गरज याची कल्पना मंत्री महोदयांना ॲड संजय सावंत पाटील यांनी दिली तसेच अभिनंदन व आभार करण्यात आले. वढु बु ग्रामपंचायत कमिटी व वढु बु ग्रामस्थाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी शिरुर लोकसभा प्रभारी आमदार माधुरी ताई मिसाळ, भाजपा जिल्हा अध्यक्ष गणेशजी भेगडे, भाजपा पुणे जिल्हा संघटन सरचिटणीस धर्मेद्र खांडरे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप दादा कंद, मा. जिल्हा परिषद अतुल भाऊ देशमुख, मिलिंदभाऊ एकबोटे, भाजपा शिरुर तालुका अध्यक्ष आब्बासाहेब सोनवणे, भाजपा नेते कैलासराव सोणवणे, भाजपा पुणे महिला शिक्षक शहर अध्यक्षा सौ. स्वाती संजय सावंत, भाजपा जिल्हा कामगार आघाडी जयेश शिंदे, भाजपा महाराष्ट्र प्रदेश, जिल्हा व तालुका पदाधिकारी, वढु बु ग्रामपंचायत कमिटी ,वढु बु ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्थित होते…
