प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती संभाजी ब्रिगेड च्या वतीने लोक प्रोबोधन दिन म्हणुन साजरी.
पुणे:आदरणीयस्मृतीशेषकेशवसितारामठाकरे (प्रबोधनकार ठाकरे)* यांचा जन्म दिवस १७ सप्टेंबर १८८५ ला झाला होता म्हणुन १७ सप्टेंबर २०२२ हा संपूर्ण भारतभर “लोक प्रबोधन दिन” म्हणून यावर्षी पासून साजरा करावा असे संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष ॲड. मनोज आखरे व महासचिव सौरभ खेडेकर यांनी जाहिर आवाहनाद्वारे सांगितले होते, मनोज आखरे व सौरभ खेडेकर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत संभाजी ब्रिगेड पुणे जिल्हा व शिवसेनेच्या वतीने कोरेगाव भीमा येथे प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात येणार आली, कोरेगाव भीमा वढू बु येथील माहेर संस्था ( अनाथालय ) येथील उपस्थित मुला- मुलींना संभाजी ब्रिगेड व शिवसेनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे, शिवसेना विभाग प्रमुख कौस्तुभ होळकर, माथाडी कामगार नेते आबासाहेब मांढरे यांच्या हस्ते,फळ व खाऊ वाटप करण्यात आले,शिवव्याख्याते शेखर पाटील यांनी व्याख्यानातून प्रबोधनकार ठाकरे यांच्या कार्याला उजाळा दिला, उपस्थितांना संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे, व आबासाहेब मांढरे यांनी मार्गदर्शन केले, यावेळी, जिल्हासचिव निलेश ढगे, विद्यार्थी आघाडी अध्यक्ष जयदीप रणदिवे, मावळ तालुकाध्यक्ष उमेश मांढरे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा मोहिनी रणदिवे, वाहतूक आघाडी उपाध्यक्ष विजय कदम, शिवसैनिक करणं कसबे, पांडुरंग वाघमारे,व माहेर संस्थेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते
