Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

आदित्य ठाकरे महाराष्ट्राची तुलना पाकिस्तानशी करतात याचं मला आश्चर्य वाटतंय – देवेंद्र फडणवीस

पुणे : राज्याच्या राजकारणात सध्या वेदांत प्रकल्पावरून जोरदार विरोधकांमध्येमध्ये आणि सत्ताधाऱ्यांमध्ये वाद सुरू आहे. त्यावर प्रमुख आदित्य ठाकरेंनी वेदांता प्रकल्प गुजरातला नेला महाराष्ट्र काय पाकिस्तान होता काय? असा सवाल भाजपला विचारला आहे. त्यावर आदित्य ठाकरे महाराष्ट्राची तुलना पाकिस्तानशी करतात याचं मला आश्चर्य वाटतंय. एकदा कंगना राणावत असं काही बोलल्या होत्या. तेव्हा केवढा गजब झाला होता. आता आदित्य ठाकरे तीच भाषा बोलणार असतील तर मला आश्चर्य वाटतं, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांना पुण्यात पत्रकारांशी बोलताना लगावला आहे.

केंद्र सरकारने आठ चित्ते भारतात आणले. त्यावर काँग्रेसने टीका केली होती. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले देवेंद्र फडणवीस म्हणाले की, काँग्रेस त्यांची जागा शोधत आहे. जनतेत नाहीत. संसदेत नाहीत. त्यांचं अस्तित्व संपुष्टात येत आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीवर टीका करण्याचं धोरणं त्यांनी अवलंबलं आहे. मला वाटतं देशातील लोकांनी चित्ते आणल्याचं स्वागत केलं आहे. मात्र, काँग्रेसकडे नकारात्मकता भरली आहे, असे जोरदार उत्तर काँग्रेसच्या टीकेला फडणवीस यांनी यावेळी दिले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading