Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNE

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवस (17 सप्टेंबर) ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती (2 ऑक्टोंबर) दरम्यान संपूर्ण देशात ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ सेवा पंधरवडा साजरा केला जात असून, या अतंर्गत संपूर्ण देशात अनेक सेवा उपक्रम राबविले जात आहेत. पुण्यातही विविध उपक्रमांचे आयोजित केले असून, त्याचा शुभारंभ आज राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाला.

पंतप्रधान मोदीजींच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चा उपाध्यक्षा माजी आ. प्रा. डॉ. मेधाताई कुलकर्णी यांच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणासाठी आज सकाळी (17 सप्टेंबर) सायकल रॅलीचे आयोजन कोथरुडमध्ये करण्यात आले होते. त्याचा शुभारंभ चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते झाला. या सायकल रॅलीमध्ये अनेक विद्यार्थी आणि तरुण सहभागी झाले होते.

सेवा पंधरवडा अतंर्गत पुणे शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने स्वच्छता मोहिम हाती घेण्यात आली होती. त्याचा शुभारंभ ही नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत झाला. पाटील यांनी पुणे रेल्वे स्टेशन परिसरातील राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. त्यानंतर रेल्वे स्टेशन परिसराची स्वच्छता केली. यावेळी माजी केंद्रीय मंत्री प्रकाशजी जावडेकर, शहर भाजपा अध्यक्ष जगदीश मुळीक, पुणे शहर संघटन सरचिटणीस राजेशजी पांडे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

सेवा पंधरवडा अंतर्गत भाजपा महिला मोर्चाच्या माध्यमातून संपूर्ण देशात आदर्श अंगणवाडी अभियान राबविण्यात येत आहे. याअंतर्गत महिला मोर्चा उपाध्यक्षा माजी आमदार प्रा. डॉ. मेधाताई कुलकर्णी यांच्या माध्यमातून कोथरुडमधील किष्किंदानगर येथील आंगणवाडी सेविकांना गौरविण्यात आले.

त्याचप्रमाणे नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या कोथरुडमधील जनसंपर्क कार्यलाय परिसरात ही सेवा पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे. याअंतर्गत कोथरुडमधील नागरिकांना विविध प्रकारचे दाखले मोफत उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. त्याचा शुभारंभही आज नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते झाला. त्यासोबतच अंगणवाडी सेविकांना सतरंजीचे वाटपही यावेळी करण्यात आले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading