Wednesday, June 17, 2026
BusinessLatest News

‘बजाज अलियान्झ लाइफ इन्शुरन्स’तर्फे ‘वीर’ योजना सादर

पुणे : भारतातील आघाडीच्या खासगी आयुर्विमा कंपन्यांपैकी एक असलेल्या  ‘बजाज अलियान्झ लाइफ इन्शुरन्स’ने संरक्षण दले आणि केंद्रीय सशस्त्र पोलिस दलांसाठी (सीएपीएफ) वीर या नावाने एक समर्पित उपक्रम सादर केला आहे. या योजनेतून या कर्मचाऱ्यांना आपल्या कुटुंबियांना आर्थिकदृष्ट्या सुरक्षित ठेवता येईल. ‘वीर’ या नवीन बिझनेस चॅनेलचा भाग म्हणून, ‘बजाज अलियान्झ लाइफ इन्शुरन्स कंपनी’ देशाच्या या शूरवीरांसाठी आयुर्विम्याच्या नाविन्यपूर्ण योजना आणि काही अनन्य सेवा उपलब्ध करणार आहे. त्यामुळे जवानांना व पोलिसांना आपली दीर्घकालीन उद्दिष्टे पूर्ण करता येतील.

‘बजाज अलियान्झ लाइफ इन्शुरन्स’चे मुख्य बीएएलआयसी डायरेक्ट ऑफिसर अमित जैस्वाल म्हणाले, “संरक्षण दले ही देशाचा कणा असतात, कारण या दलांतील जवान प्रतिकूल परिस्थितीतही नागरिकांचे रक्षण करण्यासाठी आपला जीव धोक्यात घालतात. त्यांच्या निःस्वार्थ सेवेबद्दल त्यांचे केवळ आभार न मानता, त्यांच्यामध्ये आयुर्विम्याबद्दल जागरुकता निर्माण करून त्यांची जीवनातील उद्दिष्टे साध्य करण्यात त्यांना मदत करण्याचा आमचा प्रयत्न आहे. हे काम ‘वीर’च्या माध्यमातून आम्ही करणार आहोत. या जवानांच्या खास गरजांसाठी डिझाइन केलेल्या मूल्यात्मक आयुर्विमा योजना आम्ही त्यांना देऊच, त्याशिवाय काही विशेष सेवा आणि फायदेदेखील उपलब्ध करून देऊ. त्यातून त्यांना आपल्या कुटुंबासाठी आर्थिक सुरक्षा जाळे तयार करण्यात मदत होईल.”

संरक्षण दल आणि सीएपीएफ यांच्यासाठी कंपनी ‘वीर’च्या माध्यमातून बजाज अलियान्झ लाइफ अॅश्युअर्ड वेल्थ गोल – वेल्थ क्रिएशन ही योजना पुढे आणत आहे. ही एक नॉन-लिंक्ड, नॉन पार्टिसिपेटिंग, वैयक्तिक स्वरुपाची, आयुर्विम्याची बचत योजना आहे. मुलांचे उच्च शिक्षण किंवा त्यांचे विवाह, सुटीमध्ये परदेशवारी, घरबांधणी अशी जीवनातील काही उद्दिष्टे पार पाडता येण्यासाठी ही योजना उत्पन्नाची हमी देते.

वीर चॅनेलची प्रमुख वैशिष्ट्ये:

  • मासिक आधारावर पॉलिसी प्रीमियम भरण्याची सोय
  • (काही निवडक प्रकारच्या उत्पादनांबाबत) पॉलिसी कालावधीच्या शेवटी एकरकमी रक्कम मिळण्याची हमी
  • युद्ध आणि युद्धासारख्या परिस्थितीसाठी विमासंरक्षण
  • अगदी कमीतकमी कागदपत्रे, पॉलिसी त्वरीत जारी होणे आणि कोणत्याही वैद्यकीय चाचण्यांची गरज नसणे यांसारख्या विशेष सेवा.
  • त्वरीत सहाय्य मिळण्यासाठी सेल्फ-सर्व्हिसिंग डिजिटल मालमत्तेची सुविधा

याव्यतिरिक्त, वीर उपक्रमाचा एक भाग म्हणून, ‘बजाज अलियान्झ लाइफ इन्शुरन्स’तर्फे सशस्त्र दलांतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आणि वीर नारींना (सैनिकांच्या विधवा पत्नी) कंपनीच्या कार्यालयांमध्ये करिअरच्या संधी प्रदान करण्यात येतील व त्यायोगे त्यांना सक्षम बनवण्यात येईल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading