Wednesday, June 17, 2026
Latest NewsSports

महाराष्ट्र राज्य क्लोज्ड स्क्वॅश अजिंक्यपद स्पर्धेत पाच मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का

पुणे :  महाराष्ट्र राज्य स्क्वॅश रॅकेट संघटना, एकता युवक विकास मंडळ आणि पुणे जिल्हा स्क्वॅश रॅकेट संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित  महाराष्ट्र राज्य क्लोज्ड स्क्वॅश अजिंक्यपद स्पर्धेत उपांत्यपुर्व फेरीच्या लढतीत 15 वर्षाखालील मुलींंच्या गटात अनिका दुबे, आरिका मिश्रा व मुलांच्या गटात हृदान शहा13 वर्षांखालील मुलांच्या गटात हर्ष जोशी, महिला गटात मेहक गुप्ता यांनी खेळाडूंनी मानांकित खेळाडूंवर विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

द वेस्टीन हॉटेल, कोरेगाव पार्क आणि आरएसआय क्लब कॅम्प येथे सूरू असलेल्या या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत 15 वर्षांखालील मुलीच्या गटात बिगर मानांकित अनिका दुबेने अव्वल मानांकित ईशा श्रीवास्तव हिचा 11-7, 9-11, 11-9 असा पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली. आरिका मिश्राने 6व्या मानांकित  महथी सुब्रमण्यमचा 11-2,11-2 असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली. रुचा वारलेने  राधिका इजातेचा 10-12, 11-4, 11-6 असा तर 4थ्या मानांकित करीना फिप्सने   ग्रेसी जंजानीचा 11-1,11-0 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. याच मुलांच्या गटात हृदान शहा याने दुसऱ्या मानांकित  यश साठेचा 11-7, 9-11, 11-6 असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदवला.
 
13 वर्षांखालील मुलांच्या गटात उपांत्यपूर्व फेरीत 5व्या मानांकित हर्ष जोशीने अव्वल मानांकित स्वारीत पाटीलचा  13-11, 11-7 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. दुस-या मानांकित अगस्त्य राजपूतने 7व्या मानांकित श्रेयांश झा 11-5, 11-8 असा पराभव केला. 15 वर्षांखालील मुलांच्या गटात उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत अव्वल मानांकित इशान दाबकेने  पार्थ शेळकेचा 11-5,11-4 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. 3-या मानांकित अर्जुन मोरेने 5व्या मानांकित आदित्य यादवचा 11-9,11-5 असा तर 4थ्या मानांकित हृदय रजनीने 7व्या मानांकित आर्यन शर्माचा 11-2, 11-4 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. 
 
11 वर्षांखालील मुलांच्या गटात उपांत्यपूर्व फेरीत अव्वल मानांकित बुरहान भानपुरवालाने अरमान चौधरीचा 11-2, 11-5 असा तर दुस-या मानांकित रेयांश कारिया याने  विनय शिंदेचा 11-6, 4-11, 11-9 असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली. 5व्या मानांकित आदित्य शहाने क्रिशिव मित्तलच् 11-3,11-4 असा तर ध्रुव दुबेने विवेक शिंदेचा 11-9,11-7 असा पराभव केला. मुलींच्या गटात अव्वल मानांकित मन्या संघवीने 5व्या मानांकित  महिका सुब्रमण्यमचा 11-7, 14-12 असा तर तिस-या मानांकित शुभांजली यादवने 7व्या मानांकित  रुही लोढा 11-1,11-0 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. देवकी आनंदने  ईशा शेळकेचा 11-5, 11-6 असा तर 2-या मानांकित गार्गी कदमने रियांशी वर्माचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. 
 
स्पर्धेचा सविस्तर निकाल

11 वर्षांखालील मुले: उपांत्यपूर्व फेरी:
बुरहान भानपुरवाला(1) 
 वि.वि   अरमान चौधरी 11-2, 11-5;
आदित्य शहा(5/8) 
 वि.वि   क्रिशिव मित्तल 11-3,11-4;
ध्रुव दुबे वि.वि विवेक शिंदे 11-9,11-7
रेयांश कारिया(2)  वि.वि   विनय शिंदे 11-6, 4-11, 11-9

11 वर्षांखालील मुली: उपांत्यपूर्व फेरी
मन्या संघवी(1)  वि.वि   महिका सुब्रमण्यम (5/8) 11-7, 14-12;
शुभांजली यादव 
 (3/4)  वि.वि   रुही लोढा(5/8) 11-1,11-0;
देवकी आनंद 
 वि.वि   ईशा शेळके 11-5, 11-6;
गार्गी कदम (2) 
 पुढेचाल.वि   रियांशी वर्मा (5/8)

13 वर्षांखालील मुले: उपांत्यपूर्व फेरी:
हर्ष जोशी(5/8)वि.वि स्वारीत पाटील(1)  13-11, 11-7

दिविज दवे (3/4)वि.वि अर्णव रँडेरी 14-12,11-1 
आदित्य घोडके (5/8)वि.वि विवान सागर  (3/4) 13-11,11-4
अगस्त्य राजपूत (2) वि.वि श्रेयांश झा (5/8) 11-5, 11-8

15 वर्षांखालील मुले: उपांत्यपूर्व फेरी:
इशान दाबके(1)  वि.वि  पार्थ शेळके 11-5,11-4
अर्जुन मोरे  (3/4)वि.वि  आदित्य यादव (5/8) 11-9,11-5

हृदय रजनी (3/4)   वि.वि आर्यन शर्मा (5/8) 11-2, 11-4
हृदान शहा वि.वि यश साठे (2) 11-7, 9-11, 11-6;

15 वर्षांखालील मुली: उपांत्यपूर्व फेरी
अनिका दुबे  वि.वि   ईशा श्रीवास्तव(1)11-7, 9-11, 11-9;
रुचा वारले 
 वि.वि   राधिका इजाते 10-12, 11-4, 11-6;
करीना फिप्स 
 (3/4)   वि.वि   ग्रेसी जंजानी 11-1,11-0;
आरिका मिश्रा 
 वि.वि  महथी सुब्रमण्यम(5/8) 11-2,11-2

 
पुरुष: चौथी फेरी
पार्थ अग्रवाल(1) वि.वि निर्मल सिंग 11-1,11-4
रोहित हाप्पे 
 वि.वि   लखेंद्र राठोड 11-8, 11-6;
अंशुल गोयल 
 वि.वि   रुग्वेद ढवळे 11-4, 11-2;
मोहित भट्ट 
 वि.वि   दीपक तिवारी (3/4) 11-8,11-7
अविनाश यादव(3/4) 
 वि.वि   तथागत मल्हारे 11-7, 11-6;
जैनेंद्र भंडारी 
 वि.वि   यश माखिजा (5/8) 11-9,11-9;
दिवित पूजारी(2) 
 वि.वि   निखिल गोयल 11-9, 11-7;

महिला: दुसरी फेरी
सुनीता पटेल (1)  वि.वि अनिता कापडे 11-1, 11-1
वर्षा कुमावत 
 वि.वि. अमोली साळवी 11-5,11-9
रितश्री महिधर  (3/4)   वि.वि   रीमा साठे 11-3,11-2
श्रेया कोल्हे  वि.वि  आंचल मुंडकूर 11-1,11-4

शुद्धा सेठ  (3/4)  पुढेचाल.वि   प्रियांका पोतदार
उपांत्यपूर्व फेरी: मेहक गुप्ता वि.वि रितश्री महिधर  (3/4) 11-8, 11-4.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading