Sunday, June 21, 2026
BusinessLatest News

सनस्टोनतर्फे भारतातील पहिले करिअर कौन्सिलिंग सेंटर ऑन व्हील्सचे पुण्यात आगमन 

पुणे भारतातील अग्रगण्य उच्च शिक्षण सेवा पुरवठादारांपैकी एक आणि ३५ शहरांमध्ये ४५ हून अधिक संस्थांमध्ये स्थान असलेले सनस्टोनचे द करिअर कोच हे भारतातील पहिले चलित करिअर समुपदेशन केंद्र पुण्यात दाखल झाले आहेअंडरग्रॅज्युएट इच्छूकांना योग्य करिअर निवडण्यास मदत करणे  आणि त्यांना सनस्टोनच्या योजनांचा सखोल अनुभव पुरविणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

 

ईएमपीआय नवी दिल्ली येथून प्रवास सुरू केल्यानंतर ‘करिअर कोच‘ ४५ दिवसांच्या कालावधीत तीन प्रमुख राज्ये आणि अनेक शहरांमधून प्रवास करणार आहे. पुण्यात करिअर कोच व्हॅन ५ दिवस (१२ सप्टेंबर-१६ सप्टेंबर) राहणार असून एडीवायपीयूइंदिरा कॉलेज, फर्ग्युसन रस्ताभारती विद्यापीठ आणि पिंपरी या भागात येणार आहे.

 

भारतातील पहिल्या चलित करिअर समुपदेशन केंद्रासह सनस्टोनचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांसाठी मोफत करिअर समुपदेशनाचे लोकशाहीकरण करण्याचे आहेकरिअरचा योग्य मार्ग निवडण्यात विद्यार्थ्यांची होत असलेली द्विधा परिस्थिती सनस्टोन समजून घेतोम्हणूनच या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना त्यांची आंतरिक शक्तीयोग्यता आणि आकांक्षा समजून घेण्यास मदत करण्याची कल्पना आहेत्यांच्या  करिअर चेक‘ संवादात्मक चाचणीचा एक भाग म्हणून सनस्टोन तंत्रज्ञान आणि बिगर तंत्रज्ञान अशा दोन्ही प्रकारच्या विविध करिअर डोमेनवर आधारित अनेक करिअर मार्गांसाठी करिअर योजना पुरवितो.  समुपदेशक विद्यार्थ्यांना त्यांच्या आकांक्षांच्या संदर्भात करिअर पर्यायांचा स्नॅपशॉट प्रदान करतील आणि ते पूर्ण करण्यासाठी कोणता प्रोग्राम निवडायचा याची शिफारस देखील करतील.

 

सनस्टोनचे सहसंस्थापक आणि सीओओ श्री पियुष नंगरू करिअर कौन्सिलिंग ऑन व्हील्सच्या  शुभारंभप्रसंगी बोलताना म्हणाले, “भारतातील पहिलेवहिले करिअर कौन्सिलिंग सेंटर ऑन व्हील्स‘ सुरू करताना आम्हाला आनंद होत आहेउद्योग आणि शिक्षण क्षेत्र कौशल्यातील दरी भरून काढण्याच्या उद्देशाने सनस्टोन उच्च शिक्षणासाठी उद्योगाभिमुख अभ्यासक्रम समाविष्ट करण्यासाठी व्यवहार्य उपाय तयार करत आहेआमच्या नाविन्यपूर्ण करिअर कोचद्वारे आम्ही विद्यार्थ्यांना त्यांच्यासाठी सर्वात योग्य करिअरसह त्यांची ताकद आणि आकांक्षा ओळखण्यात मदत करण्याकरता मोफत करिअर समुपदेशन देण्यासाठी पुण्यासारख्या प्रदेशातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत आहोतआमचे करिअर  प्रशिक्षक विद्यार्थ्यांना व्हीआर गेम्स आणि संवादात्मक चाचण्यांद्वारे अनेक महाविद्यालये आणि अभ्यासक्रम शोधण्याची अनुमती देतात.”

करिअर प्रशिक्षक इच्छुक विद्यार्थ्यांमध्ये सनस्टोनच्या मुख्य योजनांवर प्रकाश टाकणार असून भागीदार महाविद्यालयांना विद्यार्थ्यांना वाढीव लाभ मिळवून देण्यात सक्षम करणार आहेत. करिअर कौन्सिलिंग सेंटर ऑन व्हील्स‘ द्वारे सनस्टोन काही निवडक विद्यार्थ्यांना १० कोटी रुपयांची शिष्यवृत्ती आणि १५ लाख रुपयांच्या भेटवस्तू याव्यतिरिक्त त्यांच्या पुढील ऑनलाइन मोहिमेचा चेहरा बनण्याची संधी देत​​आहे. सनस्टोन त्याच्या उद्योगाभिमुख शिक्षणाचे फायदे दर्शविण्यासाठी #ExperiencedFresher मोहीम राबवणार आहेसखोल उद्योग ज्ञान असलेले पात्र सक्षम विद्यार्थी त्यांचे भविष्य कसे बदलू शकतात हे या मोहिमेतून दाखविण्यात आले आहे.

 

सनस्टोन आपल्या भागीदार संस्थांमधील विद्यार्थ्यांना प्लेसमेंट सहाय्यविद्यार्थीअनुकूल वित्तपुरवठा पर्यायभविष्यासाठी तयार उद्योगकेंद्रित प्रशिक्षण आणि सनस्टोन एक्स्ट्राकरिक्युलर क्लब आणि समुदायांद्वारे ३६० डिग्री असे सर्वांगीण शिक्षण सादर करते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading