सह्याद्री इंडस्ट्रीजचे सत्येन पटेल यांची पीजीकेएम ( PGKM) च्या विश्वस्त पदावर नियुक्ती
पुणे: सत्येन व्ही पटेल यांची पूना गुजराती केळवाणी मंडळ (PGKM) या एज्यूकेशनल आणि चॅरिटेबल इस्टीट्यूटच्या विश्वस्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. विश्वस्त मंडळाचा एक भाग म्हणून पटेल हे पीजीकेएमला नव्या धोरणात्मक दृष्टीकोणातुन मार्गदर्शन प्रदान करण्याचे कार्य करतील.
पीजीकेएम हे पुण्याचे पहिले एनईपी २०२० प्रेरित डे बोर्डिंग स्कूल आणि एक अल्ट्रा-मॉडर्न गुरुकुल आहे. उद्याच्या पिढीला नव्याने घडवण्यासाठी ते कार्यरत आहेत. जिथे मुलांना आधुनिक शिक्षणात आघाडीवर ठेवण्यासाठी तंत्रज्ञानाच्या शिक्षणासोबतच गुरुकुल सारखी नैतिकता, मूल्ये आणि तत्त्वे शिकवली जातात. पीजीकेएमचे ध्येय आहे होतकरू विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित शिक्षण व वातावरण तयार करणे, जे उद्याचे नेते, उद्योजक आणि भविष्य आहेत. हे विद्यार्थी याच वयात समाजातील बदल, गतिशीलता समजून घेतात त्यासोबत वाढतात . लहान वयातच मुले शैक्षणिक उत्कृष्टतेच्या सर्वोच्च स्तरावर शिक्षित होण्यास सुरवात होते. याचवेळी ते योग्य मूल्यांसह मन आणि अंतःकरणाने घडत असतात, आणि याचवेळी त्यांना योग्यरित्या जीवनाचे मार्गदर्शन करणे हाच पीजीकेएमचा उद्येश्य आहे.
सत्येन पटेल यावेळी म्हणाले, “या नियुक्तीबद्दल मी खुप आनंदी आहे आणि ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. संस्थेचे मार्गदर्शन आणि नेतृत्व करण्यासाठी मी माझ्या क्षमतेनुसार सर्वोत्तम प्रयत्न करीन. मुलं हे आपलं भविष्य आहेत आणि आपल्या देशाला आणि समाजाला मदत करण्याचा यापेक्षा चांगला मार्ग कोणता असेल, ज्यायोगे मुलांना मार्गदर्शन आणि शिक्षणाच्या दृष्टीने व उत्तम भविष्यासाठी मदत करता येईल.” सत्येन पटेल हे सह्याद्री इंडस्ट्रीज लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आहेत, बिल्डिंग मटेरियल मॅन्युफॅक्चरिंग स्पेसमधील कार्यासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली सह्याद्री इंडस्ट्रीज लिमिटेडला भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने “एक्सपोर्ट हाऊस” चा दर्जा बहाल केला आहे. ‘मेक इन इंडिया’ च्या अनुषंगाणे ्निर्यातीतील वाढीला गती देण्यासाठी आणि आपल्या इकोप्रो ब्रँडच्या फायबर सिमेंट बोर्डांसाठी कंपनीला हा दर्जा दिला गेला आहे. ज्यामुळे ते जगभरात ओळखले जात आहेत. नुकताच सह्याद्री इंडस्ट्रीजचा उल्लेख फोर्ब्स मासिकात २०२१ मधील आशियातील सर्वोत्कृष्ट म्हणुन झाला आहे. सह्याद्रीच्या ब्रँड्स मध्ये छतासाठी स्वस्तिक, इकोप्रो- मल्टीपर्पज फायबर सिमेंट बोर्ड, वीकेंड होम्ससाठी एस ३, दरवाजे आणि मेझानाइन फ्लोअरिंगसाठी सेम्पली या सर्वाचा समावेश आहे. सत्येन पटेल हे इकोलाइट ब्रँड एएसी ब्लॉक्सचे उत्पादन करणार्या जेव्हीएस कोमॅटस्को मध्ये संचालक म्हणूनही कार्यरत आहेत. त्याने अलीकडेच आयएसबी हैदराबाद येथे पीजीपीएमएएक्स (PGPMAX) एक्झीक्युटीव्ह एमबीए प्रोग्राम पूर्ण केला आहे. सह्याद्री इंडस्ट्रीज लिमिटेड एक सिंगल प्रोडक्ट कंपनी म्हणून सुरू झाली आणि सत्येन पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली एक मल्टी-प्रॉडक्ट्स, मल्टी ऍप्लिकेशन्स, मल्टी लोकेशन्स ग्लोबल कंपनी बनली आहे. पटेल हे सध्या “लक्ष्य” चे अध्यक्ष आहेत जो की राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त स्पोर्ट एनजीओ आहे. नुकतेच अचंता शरथ कमल आणि श्रीजा अकुला यांनी लक्ष्याच्या पाठिंब्याने कॉमन वेल्थ गेम्समध्ये टीटी मिक्स डबल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे.
