उद्धव ठाकरे आणि आदित्यही मंत्रालयात किती वेळा आले होते?-शिक्षण मंत्री दीपक केसरकर
पुणे : शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे हे सारखे देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांच्यावर काही काम करत नाही असा आरोप करत आहे. त्यावर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही नेते आपला पूर्ण वेळ देतात आणि आपलं काम करतात. घरात बसून राज्य चालवायचं दिवस गेले. आदित्य ठाकरेंच्या प्रश्नांवर उत्तर द्यायला मी मंत्री झालो नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे किती वेळ मंत्रालयात आले आणि आदित्यही किती वेळा आले होते? असा सवाल शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरें व आदित्य ठाकरे यांना केला.
दीपक केसरकर यांनी आज विविध मुद्द्यांवर पत्रकारांशी संवाद साधला. दीपक केसरकर म्हणाले,घरात बसून राज्य चालवायचं दिवस गेले. आदित्य ठाकरे यांनी बंडखोरीनंतर सातत्याने बंडखोर गटाला सातत्याने ‘गद्दार’ असे संबोधत केले आहे. तर आदित्य ठाकरे यांनी आमदारांवर वारंवार वेगवेगळ्या प्रकारचे आरोप केले आहेत. त्यावर दीपक केसरकर म्हणाले त्यांनी ४० गद्दारासाठी मीही कधीकाळी एका मंचावर येत त्यांच्यासाठी प्रचार केला होता. त्यामुळे मलाही आता लाज वाटते. तसेत बंडखोर आमदारांनी शिवसेनेसाठी नाही, हिंदूत्वासाठी नाही तर आपल्या स्वार्थासाठी ते गेले आहेत.अशा शब्दात दीपक केसरकर यांनी बंडखोर आमदारांवर घणाघात केला.
वेगवेगळ्या पेपर मध्येटीईटी बाबत दोषीवर कारवाई कधी केली जाणार असा सवाल उपस्थित होत आहे. त्यावर केसरकर म्हणाले,कोणाला निर्दोष होईपर्यंत कामावरघेतले जाणार नाही.पण एक चुकीची प्रवृत्ती शिक्षणात आली तर शिक्षणाचा खेळ खंडोबा होईल. असे दीपक केसरकर म्हणाले.
