Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

Sex Tantra – अखेर आयोजकांनी केला कार्यक्रम रद्द

पुणे : सामाजिक व राजकीय संघटनांनी तीव्र आक्षेप नोंदवल्यानंतर सत्यम शिवम् सुंदरम् या फाउंडेशनने आजोजित केलेला ‘सेक्स तंत्र’ हा कार्यक्रम अखेर रद्द करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशमधील या फाउंडेशनचे प्रमुख रवी सिंग यांच्याशी यासंदर्भात पोलिसांनी संपर्क साधला असल्याची माहिती आहे. गुन्हे शाखेच्या सामाजिक विभागाने देखील याची दखल घेतली आहे.
नवरात्र उत्सावाच्या निमित्ताने तरुणांना लैंगिक प्रशिक्षणासाठी ऑनलाईन नावनोंदणी सुरू झाली आहे. त्याबाबत सोशल मीडियावर जाहिरातींचा मोठा मारा करण्यात आला. दोन दिवसिय निवासी शिबिरासाठी पंधरा हजार रुपये शुल्क असून त्याअंतर्गत निरनिराळी लैंगिक तंत्रांचे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचा दावा या जाहिरातीच्या माध्यमातून करण्यात आला आहे.
जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर अनेक संघटनांनी यासंदर्भात तीव्र संताप व्यक्त केला. ‘ या विकृत शिबीराला नवरात्री स्पेशल असं नाव दिलं गेलं. शिबीराच्या जाहिरातीत आयोजकांचा पत्ता, कार्यक्रमाचे ठिकाण आणि अन्य कोणतीही माहिती नाही. यावरूनच हे सर्व फसवे , घाणेरडे आणि एका विकृत संस्कृती ला जन्म देणारे ठरणार आहे .आणि यासंदर्भात पोलिसांना निवेदन दिले आहे, असे दवे यांनी कळवले आहे. शहरातील अन्य अनेक संघटनांनी यासंदर्भात तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. ज्या आयोजकांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यांच्यावर कशाप्रकारे कारवाई करण्यात येईल याबाबत पहाणी चालू असल्याची पुणे पोलिसांनी माहिती दिली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading