Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNE

बी एस एन एल एम्प्लॉइज युनियन च्या वतीने  JTO उत्तीर्ण कर्मचाऱ्यांचा सन्मान

पुणे : बी एस एन एल एम्प्लॉइज युनियन पुणे यांच्यावतीने  इंजिनियर्स डे निमित्त BSNL मधील 24 ज्युनियर इंजिनिअर Junior Telecom Officer परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल सर्व उत्तीर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांचा संघटनेच्यावतीने सत्कार करण्यात आला. यासमयी पुणे BSNL चे प्रधान महाप्रबंधक श्री शामुवेल भातंब्रे साहेब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसेच न्यू दिल्ली BSNLEU उपाध्यक्ष कॉ.नागेश नलावडे, SNEA संघटनेचे श्री सुनील सोनवणे व SC ST असोसिएशनचे श्री विजय नारायणकर उपस्थित होते.
यावेळी बोलताना शामुवेल भातांब्रे यांनी उत्तीर्ण झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या व BSNL च्या पुढील आव्हानांचा उल्लेख केला व लवकरच BSNL कसे प्रॉफिट मेकिंग कंपनी होऊ शकते याविषयी मार्गदर्शन केले तसेच मागील तीन महिन्यात BSNL ला झालेल्या प्रोफिटची माहिती दिली व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुणे जिल्ह्यात पोस्टिंग करिता प्रयत्न करू असे सांगितले. तसेच नागेश नलावडे, युसुफ जकाती, सुनील सोनवणे, विजय नारायणकर, आदींनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे प्रास्तविक जिल्हा अध्यक्ष युसुफ जकाती यांनी केले. सूत्रसंचालन जिल्हा सचिव विकास कदम यांनी केले तर आभार गणेश भोज यांनी मानले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किशोर गवळी, नितीन कदम, दत्तात्रय कऱ्हे, समीर देखणे, मनीष पालकर, शामा गांधी, राजेश जाधव, शशीकांत पवार, विजय झगडे आदींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading