Wednesday, June 17, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

Sex Tantra – मनसे महिला आघाडी आक्रमक आयोजकांवर कारवाई करण्याची मागणी


पुणे : शहरात नवरात्र उत्सावाच्या निमित्ताने तरुणांना लैंगिक प्रशिक्षण देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सत्यम शिवम् सुंदरम् या फाउंडेशनच्या वतीने सेक्स तंत्र नावाने या प्रशिक्षणाचे ऑनलाईन बुकींग करण्यात येत आहे.


लैंगिक प्रशिक्षण देण्यासंदर्भात जाहिरात आणि मेसेज सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. या लैंगिक शिबिराचे आयोजन १, २ आणि ३ ऑक्टोबर २०२२ दरम्यान करण्यात आले आहे. यात तरुण आणि तरुणी सहभाग घेणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. या विरोधात
काय सामाजिक संघटना व विविध पक्ष आक्रमक झाले आहेत.मनसे महिला आघाडी आक्रमक झाली आहे. शिबिराच्या आयोजकांवर कारवाई करण्याची मागणी मनसे महिला आघाडीने केली आहे. मनसे महीला आघाडीने पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना निवेदन दिल आहे.
आयोजकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी या निवेदनातून केली आहे. आयोजकांवर कारवाई न केल्यास मनसे रस्त्यावर उतरण्याचा इशारा मनसे महिला आघाडीच्या शहराध्यक्षा वनिता वागस्कर  यांनी दिला आहे. यावेळी मनसे महिला आघाडीच्या कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading