Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNE

२० हजार वनौषधी रोपांचे वाटप  

पुणे – वनराई आणि आयुष मंत्रालयाचे राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळाच्यावतीने गणेशोत्सव काळातील १० दिवसांमध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळामध्ये तब्बल २० हजार वनौषधी रोपांचे वाटप करण्यात आले. अभिषेक करणाऱ्या प्रत्येकाला औषधी रोप वाटप करण्यात आले. जेष्ठमध, अश्वगंधा, शतावरी, पिंपळी, आवळा, मंजिष्ठ, कडुनिंब, गुळवेल, गुग्गुळ, ब्राह्मी, तुळस, सर्पगंधा, अडुळसा,इसबगोल, बावची, बेल, कुळीथ इ. वनौषधी रोपांचे वाटप करण्यात आल्याची माहिती वनराईचे अध्यक्ष रविंद्र धारिया यांनी दिली.

यावेळी वनराईचे विश्वस्त धन्यकुमार चोरडीया, सचिव अमित वाडेकर, डॉ. दिगंबर मोकाट, दगडूशेठ हलवाई गणपती ट्रष्टचे कोषाध्यक्ष महेश सुर्यवंशी उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading