पुणे विद्यापीठातील पहाटेपासून वीज पुरवठा खंडित विद्यार्थी आक्रमक
पुणे:सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा एक्सप्रेस फिडर ट्रीप झाल्यामुळे विद्यापीठ परिसराचा वीज पुरवठा आज सकाळी 2.40 पासून खंडीत झालेला आहे.तो अजूनही पूर्ववत झालेला नाही. त्यामुळे विद्यापीठातील काही विद्यार्थी वीज पुरवठा चालू करावा यासाठीआक्रमक झाले आहेत.विद्यापीठ उच्चदाब ग्राहक असल्याने कॅम्पसमध्ये वीज पुरवठ्याची जबाबदारी ही विद्यापीठाची आहे असे महावितरणकडून सांगण्यात आले आहे.
विद्यापीठ एक्सप्रेस फिडर ट्रीप झाल्याबद्दल व पेट्रोलिंग करण्यासाठी विद्यापीठचे असिस्टंट इंजिनिअर सागर पवार यांना कळवण्यात आले तसेच विद्यापीठ तंत्रज्ञ कांबळे यांनाही कळविण्यात आलेले आहे. परंतु विद्यापीठाचे असिस्टंट इंजिनिअर यांनी सांगितले की, नाईट ड्युटीमधे त्याचे कोणी कर्मचारी उपलब्ध नाहीत त्यामुळे ते पेट्रोलिंग करू शकत नाही. कर्मचारी उपलब्ध झाल्यावर लाईन पेट्रोलिंग करण्यात येईल, असे त्यांनी कळविले. सदर दोष हा विद्यापीठ उच्चदाब ग्राहक यांच्या बाजूने असून वीज पुरवठ्यात होणारे व्यत्यय व खंडीत वीज पुरवठ्याची सर्व जबाबदारी ही विद्यापीठाची आहे याला महावितरण जबाबदार नाही. असे महावितरणकडून विद्यार्थ्यांनासांगण्यात आले आहे.
