Wednesday, June 17, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

शिंदे गटाचे सगळे निर्णय दिल्लीतून होतात -खासदार सुप्रिया सुळे

पुणे :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांना सारखे दिल्लीला जावे लागते त्यामुळे. दिल्लीतून सरकार चालते का असे विरोधक सतत टीका करत असतात. त्यावर छत्रपतींचं नाव घेऊन हे सरकार सत्तेत आलं. पण छत्रपती कधी दिल्लीसमोर झुकले नाहीत. हे सरकार सातत्याने दिल्ली म्हणेल तेच करतं. दुर्दैवाची गोष्टी ही आहे जी शिवसेना, ज्याकडे भाजप यायचा, आता शिंदे गटाचे सगळे निर्णय दिल्लीतून होतात . अशी टीका राष्ट्रवादीच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली.

फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला नेऊन महाराष्ट्र, मुंबईचं महत्त्व कमी करण्याचा काम सुरु आहे. केंद्र सरकार महाराष्ट्राच्या विरोधात हा कट करत आहे. असा आरोप सुप्रिया सुळे यांनी यावेळी केला.
शिंदे गट शिवसेना बाळासाहेबांनी आमच्याच ताब्यात दिली असे शिंदे गटातील आमदार म्हणत आहेत. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या,बाळासाहेब सारख कोणी होणे नाही.शाळेत फॅन्सी ड्रेस व्हायचे तसे आता बाळासाहेब ठाकरे सारखे ड्रेस घालून काहीजण करत आहेत. असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
दसरा मेळावा शिंदे गट का शिवसेना करणार त्याची उत्सुकता राज्याला लागली आहे. त्यावर सुप्रिया सुळे यांना विचारले असता त्या म्हणाल्या,शिवसेनेच्या दसरा मेळाव्या बाबत पवार साहेब बोलले आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading