हे सरकार लोकांत मिसळणार आहे. त्यामुळे असे आरोप करतात – चित्रा वाघ
पुणे :फॉक्सकॉन प्रकल्प या शिंदे – फडणवीस सरकारमुळे हा प्रोजेक्ट गेला असा आरोप विरोधक करत आहे. त्यावर शिंदे फडणवीस सरकारमुळे हा प्रोजेक्ट गेला हे धांतात खोटं आहे. सुप्रिया सुळे मोठ्या नेत्या त्या काहीही बोलु शकतात.गेलं सरकार बंगल्यात बसून आणि फेसबुकवरती चालवल गेल आहे.हे सरकार लोकांत मिसळणार आहे. त्यामुळे असे आरोप करतात. अशी टीका भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना महाविकास आघाडीवर केली.
शिक्रापूर पोलिस स्टेशन हद्दीमध्ये भाजप नेते गणेश बिडकर यांच्या फार्म हाऊस वर एका बारा वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली होती. शिक्रापूर पोलिसांनी आरोपीला अटक केली होती. त्यावर चित्रा वाघ म्हणाल्या,गणेश बिडकर यांच्याबाबत त्यांनी झालेल्या घटनेबाबत सांगितले आहे.त्याच फार्म हाऊस प्रकरण,त्यांच्याकडे काम करणारे आणि नातेवाईक आहेत.बीडकर यांनी पूर्ण सहकार्य केलं आहे. असे चित्रा वाघ म्हणाल्या.
या बलात्कार प्रकरणात तृप्ती देसाई यांनी फास्ट ट्रॅक कोर्टची मागणी केली आहे. त्यावर चित्रा वाघ म्हणाल्या,तृप्ती देसाई यांनी फास्ट ट्रॅक कोर्टची मागणी केली आहे.पण आपल्याकडे फास्ट ट्रक कोर्टच नाही.मी कपाळकरंटी असून रोज बोबलत आहे.फास्ट ट्रॅक कोर्ट आणायच आहे.गेल्या सरकारने नुसते सरकार फास्ट ट्रॅकवर चालवू म्हणून फसवले आहे. अशी टीका चित्रा वाघ यांनी महा विकास आघाडी वर केली.
