Thursday, June 18, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते हनुमंत साठे यांचे निधन

पुणे : ….. आंबेडकरी चळवळीचा ढाण्या वाघ , 30 वर्श्यापासून पासून रिपबलिकन पक्ष ,पँथर आणि इतर सामाजिक चळवळीत कार्यरत असणारे हनुमंत साठे यांचे वयाच्या 56 व्या वर्षी आज आजारपणाने निधन झाले.

 रिपबलिकान पार्टी मध्ये ते गेले 30 वर्षापासून कार्य करीत होते . दलीत समाजातील मातंग व इतर जातीतील समाजाला एकत्र करण्यासाठी त्यांनी फार मोठे योगदान दिले आहे .लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांचे वाटेगाव येथील त्यांचं घराचे पहिल्यांदा पुनर्वसन त्यांनी केले .दलीत समाजाच्या विविध प्रश्नांसाठी त्यांनी कायम लढा दिला . त्यांच्या मागे मुलगा विरेन ,पत्नी सत्यभामा ,सून आणि नातवंडे असा परिवार आहे .दलीत चळवळीतील अतिशय संवेदशील असे व्यक्तिमत्व हरपले आहे . उद्या दुपारी 3 वाजता धनकवडी येथे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत . 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading