fbpx
Wednesday, April 24, 2024
BusinessLatest NewsPUNE

देहाततर्फे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी परिसंवादाचे आयोजन

 

निर्यातक्षम द्राक्षांचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचा नफा वाढविण्यासाठी आणि त्याकरिता आवश्यक सेवा व सुविधा देण्यासाठी उपक्रम

पुणे  : भारतीय शेतकऱ्यांना उत्तम मूल्य मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा करण्याच्या उद्देशाने भारतातील अग्रणीय सर्वात मोठ्या फुल स्टॅक ॲग्रीटेक व्यासपीठ असलेल्या देहात (DeHaat) या कंपनी मार्फत नाशिकमधील निर्यातक्षम द्राक्षांचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रगत शेतकरी परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.

द्राक्ष पिकांच्या जीवनचक्राबद्दल या परिसंवादा मध्ये सर्वांगीण माहिती देण्यात आली. त्याचप्रमाणे निर्यातीचे व्यावसायिक व्यवहार करण्यासाठी देहात द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना कसे सक्षम करते, याबद्दलची आवश्यक माहिती परिसंवादात देण्यात आली यामध्ये प्रामुख्याने उच्च दर्जाची शेती उत्पादने, माती परीक्षणाच्या सेवा, शेतकी तज्ञांशी सल्ला-मसलत, आर्थिक आधार, बाजारपेठेशी संलग्नता, प्रमाणपत्र मिळविणे इत्यादींचा समावेश होता जेणेकरून या शेतकऱ्यांना त्यांचा निर्यात व्यवसाय सुलभपणे करता यावा.

प्रसिद्ध हवामान अंदाजतज्ञ पंजाब डख हे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी द्राक्ष लागवडीशी संबंधित हवामानाच्या स्थितीबद्दल मोलाची माहिती पुरवली.या कार्यक्रमात संपूर्ण महाराष्ट्रातील ३५० पेक्षा अधिक द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी भाग घेतला. देहातचे वरिष्ठ टीम मेंबर तसेच कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड आणि सिंजेंटा इंडिया यांसारख्या प्रतिष्ठित कंपन्यांचे अधिकारी परिसंवादाला उपस्थित होते.

संपूर्ण सुसज्ज आणि शेती तंत्रज्ञानातील सोल्यूशन प्रोव्हाईडर असलेल्या या संस्थेने गेल्या काही वर्षांमध्ये १० लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांशी संपर्क साधला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून या शेतकऱ्यांच्या द्राक्ष निर्यात व्यवसायात वाढ करण्यासाठी त्यांच्यासोबत काम करण्याचे तसेच मोलाच्या सेवा पुरविण्याचे देहातचे उद्दिष्ट आहे. यातून या शेतकऱ्यांना भरीव नफा मिळू शकतो.

देहातचे वरिष्ठ उपाध्यक्ष रोहित सरीन म्हणाले की शेतकऱ्यांना निर्यातीसाठी त्यांचे उत्पादन आणि दर्जा वाढविण्याचे बळ मिळावे, यासाठी आपल्या मजबूत आणि बुद्धिमान सेवांच्या माध्यमातून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना भरीव मूल्य मिळवून देण्याचे देहातचे उद्दिष्ट आहे.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading