Thursday, June 18, 2026
Latest NewsSports

‘एक्स्ट्रॉमार्क्स युथ फुटबॉल चॅम्पियनशिप’तर्फे ‘आर्सेनल एफसी’च्या भागीदारीत राष्ट्रीय आंतर-शालेय फुटबॉल स्पर्धा

पुणे : नवीन युगातील डिजिटल लर्निंग सोल्यूशन्सची अग्रगण्य जागतिक प्रदाता असलेली एक्स्ट्रॉमार्क्स ही कंपनी, ‘आर्सेनल फुटबॉल क्लब’च्या भागीदारीत ‘युथ फुटबॉल चॅम्पियनशिप’ची भारतातील पहिली आंतरशालेय फुटबॉल स्पर्धा सुरू करण्यासाठी सज्ज झाली आहे. विद्यार्थ्यांना एकंदरीत सक्षम बनविण्यावर लक्ष केंद्रित करून, ही कंपनी देशभरातील शाळांना आणि विद्यार्थ्यांना एका मोठ्या क्रीडा महोत्सवामध्ये खेळण्यासाठी आमंत्रित करीत आहे. १५ वर्षांखालील मुला-मुलींसाठी ही स्पर्धा घेण्यात येत असून २० हून अधिक शहरांमध्ये या स्पर्धेचे सामने दोन रोमांचक टप्प्यात होतील. अंतिम फेरीतील स्पर्धकांना लंडनमधील एमिरेट्स स्टेडियमवर अंतिम सामना खेळण्याची अमूल्य अशी संधी मिळेल.

‘इंग्लिश प्रीमियर लीग क्लब’ ‘आर्सेनल एफसी’सोबत या वर्षाच्या सुरुवातीला अधिकृतपणे लर्निंग पार्टनर म्हणून भागीदारी केल्यानंतर ‘एक्स्ट्रॉमार्क्स’तर्फे या उच्चभ्रू स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यामुळे या कंपनीची क्रीडा क्षेत्रातील गुंतवणूक वाढली आहे.

मुलांच्या सर्वांगीण विकासामध्ये खेळाचे महत्त्व वाढवण्यासाठी एक्स्ट्रॉमार्क्सच्या मोहिमेला पुढे नेणे हे युथ फुटबॉल चॅम्पियनशिपचे मुख्य ध्येय आहे. एक चित्तथरारक क्रीडा स्पर्धा असण्यासोबतच, या युथ फुटबॉल चॅम्पियनशिपमध्ये शिकण्याविषयीची कार्यशाळा आणि परिसंवादात्मक सत्रांचाही समावेश असेल.

स्पर्धेसाठीची नोंदणी १२ सप्टेंबर २०२२ रोजी सुरू होईल. इच्छुक शाळा extramarks.com/yfc या वेबसाईटवर नोंदणी करू शकतात. ही स्पर्धा १५ वर्षांखालील गटातील मुली आणि मुलांसाठी आहे.

एक्स्ट्रमार्क्स एज्युकेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी ऋत्विक कुलश्रेष्ठ या संदर्भात म्हणाले, “एक्स्ट्रॉमार्क्समधील आमच्या तत्त्वज्ञानातील प्रमुख स्तंभांमध्ये सर्वांगीण शिक्षणाचा समावेश होतो. युथ फुटबॉल चॅम्पियनशिपसंबंधी चर्चा करताना आम्ही रोमांचित आहोत, कारण आम्ही देशभरातील शालेय संघांना त्यांचा उत्कृष्ट खेळ सादर करण्यासाठी एकत्र आणत आहोत. खेळाच्या मैदानावर आपापल्या अनुभवांची देवाणघेवाण करीत असताना आणि त्यातून काही शिकत असताना त्यांचे फुटबॉलचे अंतिम स्वप्नही साकार होणार आहे. लंडनमधील ‘आर्सेनल एफसी – एमिरेट्स’ स्टेडियममधील सर्वात प्रतिष्ठित मैदानावर फुटबॉल खेळण्याची आणि आपल्या आयुष्यातील एक रोमांचक खेळ खेळण्याची संधी मिळवण्याची ही अपवादात्मक आणि महत्त्वाकांक्षी संधी मुला-मुलींना या स्पर्धेतून मिळणार आहे. युथ फुटबॉल चॅम्पियनशिपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आनंद घेता यावा आणि शिकायला मिळावे, हे आमचे ‘ध्येय’ आहे!”

एक्स्ट्रॉमार्क्स एज्युकेशनच्या मार्केटिंग मार्केटिंग (ब्रँड एक्सपिरिअन्स) विभागाच्या व्हाईस प्रेसिडेंट नेहा मिश्रा म्हणाल्या, “फुटबॉल हा भारतातील सर्वात लोकप्रिय खेळांपैकी एक आहे. ‘आर्सेनल एफसी’सोबतच्या आमच्या धोरणात्मक भागीदारीमुळे या खेळात यापुढे काय होईल, याविषयी विद्यार्थी आणि पालक उत्सुक होते. आम्ही ऑफर करत असलेल्या सर्व अनुभवांमध्ये, शिकणे, सराव करणे आणि चाचणी घेणे या अध्यापनशास्त्राचा समावेश आम्ही केला आहे. आर्सेनल एफसी या प्रतिष्ठित फुटबॉल क्लबशी आमचे संबंध जुळविण्याचा युथ फुटबॉल चॅम्पियनशिप हा उत्तम मार्ग आहे. कार्यशाळा, तज्ञांसोबतची सत्रे आणि मैदानावरील आंतरराष्ट्रीय अनुभव याद्वारे शिक्षणाला महत्त्व देण्याबरोबरच, मुली आणि मुले या दोघांनाही समान संधी देऊन, त्यांचे फुटबॉल खेळण्याचे अंतिम स्वप्न साकार करण्यासाठी युथ फुटबॉल चॅम्पियनशिप या माध्यमाचा उपयोग होणार आहे. सुमारे १० हजाराहून अधिक शाळांशी आमचे संबंध आहेत. हे नेटवर्क मजबूत करीत, हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना आमच्या प्लॅटफॉर्मचा भाग होण्याचा आणि सर्वोत्कृष्ट शिक्षणाचा अनुभव घेण्याचा मार्ग मोकळा करेल. पाठ्यपुस्तकांच्या पलीकडे शिकण्यास प्रोत्साहन देणारा आणि प्रत्येक टप्प्यावर प्रेक्षकांना सक्षम बनवणारा ब्रँड म्हणून, युथ फुटबॉल चॅम्पियनशिप हा असाच एक अनुभव असेल, जो देशभरातील विद्यार्थ्यांना सर्जनशील आणि संज्ञानात्मक अशा दोन्ही संधी देईल. तुम्हाला जे आवडते ते करण्यासाठी यासारखी दुसरी योग्य वेळ असणार नाही.  प्रत्येक तरुण फुटबॉल खेळाडूसाठी आता त्याची वेळ आली आहे.”

आर्सेनल एफसीच्या मुख्य व्यावसायिक अधिकारी ज्युलिएट स्लॉट म्हणाल्या,  “युथ फुटबॉल चॅम्पियनशिप हे ‘एक्स्ट्रॉमार्क्स’सोबतच्या आमच्या भागीदारीचे फळ आहे आणि भारतात फुटबॉलला प्रोत्साहन देण्यासाठीचा एक उत्कृष्ट उपक्रम आहे. विद्यार्थ्यांना सुलभ रितीने, सर्वसमावेशकतेने आणि रोमांचक पद्धतीने शिक्षण देण्यासाठी एक्स्ट्रामार्क करत असलेल्या उत्कृष्ट कार्याचे हे उदाहरण आहे. या उपक्रमाचा एक भाग बनताना आम्हाला आनंद होत आहे. स्पर्धेची भावना निर्माण करणारा आणि नवीन काही शिकण्याच्या संधी उपलब्ध करून देणारा हा उपक्रम आहे. भारताच्या कानाकोपऱ्यातील युवा चॅम्पियन्सचे जागतिक फुटबॉलच्या केंद्रस्थानी स्वागत करण्यासाठी आणि एका रोमांचक सामन्यासाठी तयारी करण्यास आम्ही उत्सुक आहोत!”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading