अॅक्सिस बँक आणि स्क्वेअर यार्ड्सतर्फे ओपन डोअर्स ही को-ब्रँडेड होम बायर इकोसिस्टम सादर
मुंबई : भारतातील तिसरी सर्वात मोठी खाजगी क्षेत्रातील बँक अॅक्सिस बँक आणि भारतातील सर्वात मोठा एकात्मिक रिअल इस्टेट प्लॅटफॉर्म स्क्वेअर यार्ड्सने आज ‘ओपन डोअर्स’ ही को-ब्रँडेड होम बायर इकोसिस्टम सादर करत असल्याची घोषणा केली. हा अनोखा प्लॅटफॉर्म स्वतःचे स्वप्नातील घर शोधण्यापासून हा पूर्ण प्रवास ग्राहकांसाठी त्रासरहित, कार्यक्षम आणि आनंददायी अनुभव बनेल याची खात्री करेल.
निवासी मालमत्तेशी संबंधित ग्राहकांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी डिझाइन केलेला ओपन डोअर्स हा अशा प्रकारचा पहिला युनिफाइड प्लॅटफॉर्म आहे. घर खरेदी करू इच्छिणारे ग्राहक आता एंड-टू-एंड घर खरेदी सहाय्य, विशेष बिल्डर इन्व्हेंटरी अॅक्सेस, विना अडथळा गृह कर्ज प्रक्रिया आणि इतर इकोसिस्टम सेवांचा लाभ घेऊ शकतात ज्यात भाडे आणि मालमत्ता व्यवस्थापन, होम फर्निशिंग, आणि कायदेशीर आणि तांत्रिक सेवा या सर्व गोष्टी एकाच छताखाली किफायतशीर पद्धतीत मिळवू शकतात.
“गृहनिर्माणाशी संबंधित सर्व गरजा एकाच व्यासपीठावर आणण्यासाठी अॅक्सिस बँकेसोबत भागीदारी करताना आम्हाला आनंद होत आहे. वाढत्या डिजिटल इकोसिस्टममध्ये ग्राहकांसाठी सर्वसमावेशक, परवडणारी आर्थिक सेवा सुविधा प्रदान करण्यात अॅक्सिस बँक नेहमीच आघाडीवर राहिली आहे. आम्ही अॅक्सिस बँकेच्या व्यापक भौगोलिक पोहोचाचा आणि गृहखरेदीदारांचा अनुभव वाढवण्यासाठी आर्थिक उत्पादनांचा वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओचा लाभ घेऊ,” असे स्क्वेअर यार्ड्सचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी तनुज शोरी म्हणाले.
’’सहयोगाविषयी बोलताना अॅक्सिस बँकेचे रिटेल लेंडिंग अँड पेमेंट्स विभागाचे ग्रुप एक्झिक्युटिव्ह आणि प्रमुख श्री. सुमित बाली म्हणाले, “ओपन डोअर्स सादर केल्यामुळे आम्ही घर खरेदीदारांसाठी एक मजबूत इकोसिस्टम तयार करत आहोत जिथे ग्राहक मदत घेऊ शकतात, प्रॉपर्टी मोठ्या प्रमाणावर ब्राउझ करू शकतात, जलद गृहकर्जासाठी अर्ज करा आणि घराला त्यांच्या स्वप्नातील घरामध्ये रूपांतरित करण्यासाठी व्हेंडर्सशी संपर्क साधू शकतात. स्क्वेअर यार्डसह आमच्या भागीदारीचे उद्दिष्ट घर खरेदी प्रक्रियेदरम्यान आमच्या ग्राहकांना येणाऱ्या आव्हानांना सोपे करणे हे आहे. संपूर्ण भारतभर आमच्या मजबूत रिटेल बँकिंग स्थानासह सर्व ग्राहकांना गृहकर्ज सहज मिळेल हे देखील आम्ही सुनिश्चित करतो.”
ओपन डोअर्स प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केलेल्या रिअल इस्टेट इन्व्हेंटरीमध्ये स्क्वेअर यार्ड आणि अॅक्सिस बँक या दोन्हीकडून गृहखरेदी, गृहकर्ज, इंटिरिअर्स, प्रॉपर्टी व्यवस्थापन आणि इतर संबंधित मालमत्ता सेवांवर संयुक्त ऑफर असतील. याचा उपयोग ग्राहकांना होईल आणि घराच्या मालकीची एकूण किंमत कमी होईल.
या अनोख्या सहकार्याने, अॅक्सिस बँक आणि स्क्वेअर यार्डचे ग्राहक आता विना अडथळा घर खरेदी अनुभवासाठी किमान कागदपत्रांसह सानुकूलित कर्जाची रक्कम आणि लवचिक कालावधी यासह अनेक मूल्यवर्धित आर्थिक लाभ घेऊ शकतात.
अॅक्सिस बँक आणि स्क्वेअर यार्ड ग्राहकांचा प्रवास सुलभ करण्यासाठी सातत्याने डिजिटल-फर्स्ट सुविधांमध्ये नावीन्य आणत आहे. या दोन संस्थांमधील सांस्कृतिक सुसंगती यातून प्रतिबिंबित होते. ही को-ब्रँडिंग मूव्ह तांत्रिक नवकल्पना, कल्पकता आणि सोयीची सामायिक मूल्ये दर्शवते. यातून दोन्ही कंपन्यांसाठी अर्थपूर्ण उपायांसह लक्ष्यित प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची आणि त्यांच्या व्यवसायाची वाढ उंचवण्याची एक उत्तम संधी उपलब्ध करून दिली आहे.
