एकनाथ शिंदे मराठी माणसाची काळजी करत आहेत मग ही गुंतवणूक गुजरात मध्ये कशी गेली –
डॉक्टर नीलम गोऱ्हे
पुणे:महाराष्ट्रात हजारो रोजगार उपलब्ध करून देणारा वेदांत प्रोजेक्टने आपला मोर्चा गुजरातला वळवला आहे. राज्यातील खोके सरकारवर विश्वास नसल्यानेच वेदांत प्रोजेक्ट गुजरातला वळवल असं स्पष्ट होतं. महाराष्ट्रात गुंतवणूक आणण्यास खोके सरकारला इच्छा नाही. अशी टीका आदित्य ठाकरे यांनी शिंदे व फडणविस सरकारवर केली आहे. त्यावर आज राज्यात दीड लाख कोटी ची गुंतवणूक गुजरात मध्ये कशी पळवली ही माहिती समोर आले आहे.आदित्य ठाकरे यांनी या बाबत प्राथमिक बोलणी केली होती. ही गुंतवणूक महाराष्ट्रात येण्यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो .कुठलं ही डबा नसलेलं इंजिन वायू वेगाने हे गुजरातला वळवले आहे .मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठी माणसाची काळजी करत आहेत मग ही गुंतवणूक तिकडे कशी गेली. असा सवालपुण्यातील पत्रकार परिषदेत विधानसभेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारला आहे.
वेदांत ग्रुप व फोक्सकॉन कंपनीच्या संयुक्त भागीदारीत सुमारे वीस अब्ज डॉलर्स म्हणजेच एक लाख अठ्ठावन्न हजार कोटी इतकी भांडवली गुंतवणूक असलेला प्रकल्प महाराष्ट्राच्या हातातून निसटून गुजरातला गेलेला आहे. सुमारे एक लाख इतकी रोजगारक्षमता असलेला प्रकल्प महाराष्ट्राने गमावला आहे. त्यावर डॉक्टर नीलम गोऱ्हे म्हणाल्या, या प्रोजेक्ट मध्येअनेक प्रकारच्या गुंतवणूक गुजरात मध्ये केल्या गेल्या आहेत .केंद्र सरकार मुले महाराष्ट्राची गुंतवणूक गुजरात मध्ये केली जात आहे .पुण्यात, नाशकात ही गुंतवणूक केली असती तर महाराष्ट्र मोठा झाला असता. असा सवाल राज्य सरकारला नीलम गोऱ्हे यांनी विचारला.
