गणेश बिडकर यांच्या फार्म हाऊसवर अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीची येरवडा कारागृहात रवानगी
पुणे: शिक्रापूर पोलिस स्टेशन हद्दीमध्ये भाजप नेते गणेश बिडकर यांच्या फार्म हाऊस वर एका बारा वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली होती. शिक्रापूर पोलिसांनी आरोपीला अटक केली होती. आरोपीला न्यायालयाने प्रथम चार दिवस पोलिस कोठडी सुनावली होती. त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची रवानगी येरवडा कारागृहात केली आहे.
शिक्रापूर पोलिस स्टेशन हद्दीमध्ये गणेश बिडकर यांचे फार्म हाऊस आहे. सदर ठिकाणी काम करणाऱ्या एका कुटुंबातील बारा वर्षीय मुलीवर विशाल गायकवाड या युवकाने युवतीचे आई वडील बाहेर गेलेले असताना युवतीवर बळजबरीने बलात्कार केला होता. यानंतर युवतीच्या आई वडिलांना मारण्याची धमकी दिली होती. याबाबत पिडीत युवतीच्या आई वडिलांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली होती.
शिक्रापूर पोलिसांनी पोलिसांनी विशाल दामोदर गायकवाड (वय २१ वर्षे सध्या रा. भाजप नेता फार्म हाऊस ता. शिरूर जि. पुणे मुळ रा. हळणी ता. अहमदपूर जि. लातूर) याला गुन्हा दाखल होताच काही वेळात अटक केली होती. त्यांनतर राजकीय चर्चेंना मोठे वेग आले होता. भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी सदर गुन्हा फास्टट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी केली होती. शिरुर तालुक्यात अनेक राजकीय चर्चेंना उधाण आलेले होते. या गुन्ह्यातील आरोपी विशाल गायकवाड याची पोलिस कोठडी संपल्याने त्याला पुन्हा पुणे न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची येरवडा कारागृहात रवानगी केली आहे.
