राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होणार का ? वाचा काय म्हणाले अजित पवार
पुणे : राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. विविध पक्षाचे नेते देखील सहभागी होत आहेत. राष्ट्रवादी त्यामध्ये सहभागी होणार का? असा सवाल राज्याचे उपमुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेतेअजित पवार यांनी विचारण्यात आला. यावेळी महाराष्ट्राच्या संदर्भातील काही प्रश्न असतील तर मी त्याची उत्तरे देऊ शकतो. हा निर्णय देशपातळीवरचा आहे. आज मी मिरवणूक झाल्या की,.दोन दिवस दिल्लीला जात आहे. तिथे कार्यकारिणी आहे. त्याचा निर्णय दिल्लीत होईल, अजित पवार राष्ट्रीय पातळीवरचा नेता नाही असे अजित पवार म्हणाले.
भाजपने पवारांचा बालेकिल्ला बारामती जिंकण्यासाठी तयारी सुरू केली आहे. भाजपचे अनेक बडे नेते बारामती मध्ये येणार आहेत. चंद्रशेखर बावनकुळे यांनी दोन दिवसांपूर्वी बारामती मध्ये जाहीर सभा घेतली. बारामती या पवारांच्या ताब्यात जातो का अशी चर्चा आहे. त्यावर अजित पवार म्हणाले, माझं काम बोलते. त्यामुळं तुम्ही बारामतीची काळजी करु नका. माझ्यापेक्षा जास्त काम करणारं कोण असेल तर बारामतीकर त्याचा विचार करतील. असे अजित पवार म्हणाले.
त्यांना बाप्पाकडे काय मागणं केले असा प्रश्न विचारण्यात आला. यावेळी अजित पवार म्हणाले की, बाप्पाकडे काही मागणं केलं नाही. भक्तीभावानं बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी आलो आहे. प्रत्येकवेळी बाप्पाकडं मागणं केलेचं पाहिजे असे नाही असेही अजित पवार म्हणाले. मनमोकळेपणानं दर्शनाला जावं, सारखेचं त्यांना साकडं घालून त्यांना अडचणीत कशाला आणायचे आहे, असेही अजित पवार म्हणाले.
