Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNETECHNOLOGY

आदित्य ठाकरे गर्दीतून मार्ग काढत आलेले दिसताच चंद्रकांत पाटील यांनी थांबवली विसर्जन मिरवणुक

पुणे : कोरोनानंतर दोन वर्षांनी निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यात आला. त्यामुळे राज्यभरात अनंत चतुर्दशीचा उत्साह असून गणरायाच्या विसर्जनाला सुरुवात झाली आहे. आज आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी भाविकांनी ठिकठिकाणी गर्दी केली आहे.

पुण्यातील गणपती विसर्जनाला राजकीय नेत्यांनी हजेरी लावली आहे. राज्यात एकीकडे संघर्ष सुरु असताना मिरवणुकीत मात्र नेते मतभेद विसरुन एकत्र येताना दिसत आहे. असेच काहीसे चित्र पुण्यात शिवसेना नेते आदित्य आदित्य ठाकरे आणि भाजपा नेते चंद्रकांत पाटील आमने-सामने आल्यानंतर पहायला मिळाले. दरम्यान, पुण्यातील मानाचा पहिला कसबा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार होती तेव्हा आदित्य ठाकरे तिथे पोहोचले. यावेळी चंद्रकांत पाटील तिथेच उपस्थित होते. आदित्य ठाकरे गर्दीतून मार्ग काढत पालखीजवळ आले असता. चंद्रकांत पाटील यांनी त्यांना आधी दर्शन घेऊन येण्यास सांगितले.

आदित्य ठाकरे दर्शन घेऊन आले तेव्हा पालखी मार्गस्थ होण्याच्या मार्गावर होती. चंद्रकांत पाटील आणि इतर जण आदित्य ठाकरेंची वाट पाहत थांबले होते. आदित्य ठाकरे येताच विसर्जनाला सुरुवात झाली. दरम्यान, यावेळी चंद्रकांत पाटील आणि आदित्य ठाकरे एकमेकांशी गप्पा मारतानाही दिसले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading