आम्ही सरकारमध्ये असतो तरीही गणेशोत्सव निर्बंध मुक्तच झाला असता – अजित पवार
पुणे:राज्यात यंदा गणेशोत्सवाची धामधूम आहे. दोन वर्षांपासून कोरोना निर्बंधांमुळे गणेशोत्सव साजरा करता आला नव्हता. पण यंदाच्या गणेशोत्सवावर कोणतेही निर्बंध नाहीत. त्यामुळे सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे.
संख्या आटोक्यात आणायची म्हटलं तर निर्बंध लावावे लागत होते.म्हणून ही बंधनं होती. पण आता ही बंधनं हटवली गेली. त्यातून वेगळा अर्थ काढायची गरज नाही. बाप्पाच्या दर्शनाला आलं की दरवेळी मागणंच करायचं असं नाही .सारखं त्यांना साकडं घालून घालून काही अर्थ नाही. महाविकास आघाडीचे सरकार असतं तरी गणेश उत्सव निर्बंध मुक्त केला असता. असे माझी उपमुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते अजित पवार हे पुण्यात पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
अजित पवार आज पुण्यातील गणेश मंडळांना भेटी देत आहेत. तेव्हा त्यांनी प्रसार माध्यमांची संवाद साधला.
कावळ्याच्या शापाने कधी गाय मेलेली तुम्ही पाहिली आहे का? तसेच आहे नवीन नवीन अध्यक्ष झाले की बारामतीत येतात कारण बारामतीत आल्यावर मीडिया बातमी उचलून धरंते. त्यामुळे नवीन अध्यक्षाची हवा नवीन नवीन असते. असे दादा स्टाईल उत्तर अजित पवार यांनी भाजपचे नवीन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना लगावला आहे.
यावेळी अजित पवार म्हणाले की, बारामतीत माझं काम बोलत, माझ्यापेक्षा जास्त काम करणारा बारामतीत आणा त्याचा बारामतीकर नक्की विचार करतील असेही अजित पवार म्हणाले आहेत.
