अजित पवार यांनी दिल्या पुण्यातील मानाच्या गणपती सह विविध गणेश मंडळांना भेटी
पुणे :दोन वर्षानंतर राज्यात गणपतीचा उत्सव हा
मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे. सामान्य नागरिक ते वेगळ्या पक्षातील नेते वेगवेगळ्या मंडळांना भेट देऊन आरती व भेट देत आहेत. आज माजी उपमुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी पुण्यातील पहिला मानाचा गणपती कसबा गणपती, मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी, मानाचा तिसरा गुरुजी तालीम मित्र मंडळ, मानाचा चौथा गणपती तुळशीबाग मित्र मंडळ, मानाचा पाचवा गणपती केसरी वाडा, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, अखिल मंडई मंडळ व काही सार्वजनिक मंडळाचे दर्शन घेतले. व आरती केली.
यावेळी त्यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष
प्रशांत जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते प्रदीप देशमुख व प्रत्येक मंडळाचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
