Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

चंद्रकांत पाटील यांनी अभिनेते नाना पाटेकर यांच्या घरी जाऊन घेतले बाप्पाचे दर्शन

पुणे: अभिनेते नाना पाटेकर यांच्या घरी मागील तीन दिवस राजकीय पक्षाच्या नेत्यांनी गणपती दर्शनासाठी हजेरी लावली आहे. आधी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाना पाटेकर यांच्या पुणे जिल्ह्यातील सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या डोणजे गावातील घराला भेट दिली. यानंतर काल सकाळी माजी उपमुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी
अभिनेते नाना पाटेकर यांच्या घरी जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले. तर आज सकाळी भाजपचे नेते आणि राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी
अभिनेते नाना पाटेकर यांच्या घरी जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले. चंद्रकांत पाटील यांनी नाना पाटेकरांसोबत मनसोक्त गप्पा मारल्या. यावेळी नानांसोबतच्या चर्चांमध्ये अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading