एखादी व्यक्ती नव्याने प्रदेशाध्यक्ष होते तेव्हा त्यांच्या बातम्या होणंही तितकंच महत्त्वाचं असतं -रोहित पवार
पुणे:दोन वर्षांच्या कोरोना निर्बंधांनंतर राज्यसह पुण्यात गणपती विसर्जनाला उत्साहात सुरूवात झाली आहे. पुण्यातील मंडई परिसरात असलेल्या टिळक पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विसर्जन मिरवणुकीला सुरूवात झाली आहे.पुण्यात गणपती विसर्जन मिरवणुकीत रोहित पवार सहभागी झालेले असताना म्हणाले.
भाजपाने बारामती मतदारसंघावर लक्ष्य केंद्रीत केल्याचे दिसत आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बारामती मतदारसंघ ‘पवारमुक्त’ करणार असल्याचे मत व्यक्त केले
यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. एखादी व्यक्ती नव्याने प्रदेशाध्यक्ष होते तेव्हा त्यांच्या बातम्या होणंही तितकंच महत्त्वाचं असतं. असे म्हणत पवारांनी बावनकुळेंना टोला लगावला.
बारामतीत आमचा लोकांवर विश्वास आहे. तिथले लोक कोणत्या बाजूचे आहेत, कोणत्या विचाराचे आहेत हे आम्हाला माहिती आहे.
आज बारामती पवारमुक्त करायची, मुंबई ठाकरेमुक्त करायची या दोन विषयांवर भाजपाचं राजकारण केंद्रीत आहे. मात्र, सामान्यांच्या रोजगाराचे प्रश्न, बेरोजगारी कमी करणं, शेतकऱ्यांचे विषय, शहरी-ग्रामीण विषय यावर भाजपाचे नेते बोलत नाहीत. असे रोहित पवार यांनी म्हटले.
आधी चंद्रशेखर बावनकुळे, मग देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्रीही बारामतीत येणार आहेत. भाजपाच्या दाव्याप्रमाणे बारामतीत सुप्रिया सुळेंचा पराभव होईल का?” असा प्रश्न विचारला असता रोहित पवार म्हणाले, “भाजपाच्या नेत्यांनी बारामतीत आलंच पाहिजे. तेथे झालेला विकास त्यांनी समजून घेतला पाहिजे. तसेच बारामतीत जो विकास झालाय त्या मुद्द्यावरूनच राजकारण करायला हवं. असे रोहित पवार म्हणाले.
