Saturday, June 20, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

मानाच्या दुसऱ्या तांबडी जोगेश्वरी गणपती चे ५.३६ मिनिटांनी विसर्जन


पुणे: आज अनंत चतुर्दशी म्हणजेच आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्याचा दिवस आहे. यामुळे राज्यभरात गणेशाचे विसर्जन करण्यास सुरुवात झाली आहे.
यानिमित्ताने बाप्पाला दणक्यात निरोप देण्यासाठी अनेक ठिकाणी उत्साहात बाप्पाची विसर्जन मिरवणूक सुरू आहे. काही छोट्या मंडळाच्या
बाप्पांचे विसर्जन पण झाले आहे. पुण्यातील मानाचा पहिला कसबा गणपतीचा विसर्जन सोहळा पार पडला आहे.
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपतीचे दुपारी ४.१८ मिनिटांनी नदीपात्रातील पतंगा घाटात विसर्जन करण्यात आले. त्यानंतर मानाच्या दुसऱ्या
तांबडी जोगेश्वरी मित्र मंडळाच्या गणपतीचे ५.३६
मिनिटाला विसर्जन नदीपात्रातील पतंगा घाटात
करण्यात आले.
तांबडी जोगेश्वरी च्या दुसऱ्या मानाच्या गणपती मंडळाच्या मिरवणुकीच्या अग्रभागी सतीश आढाव यांचा नगारा वादानाचा गाडा आणि न्यू गंधर्व बॅंड पथक आहे. समर्थ प्रतिष्ठान, शिवमुद्रा आणि ताल ही ढोल तशा पथके तसेच विष्णू नाद हे शंख वादकांचे पथक, पारंपरिक पेहेरवतील अश्वारूढ कार्यकर्ते मिरवणुकीत होते.
यावेळी नागरिकांचा व कार्यकर्त्यांचा गणपती बाप्पा मोरयाच्या जय घोषात उत्साह दिसून आला.
यावेळी तांबडी जोगेश्वरी मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading