Wednesday, October 28, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

मानाच्या तिसऱ्या गुरुजी तालीम मंडळाचे 7.24 मिनिटांनी विसर्जन


पुणे: आज अनंत चतुर्दशी म्हणजेच आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्याचा दिवस आहे. यामुळे राज्यभरात गणेशाचे विसर्जन करण्यास सुरुवात झाली आहे.
यानिमित्ताने बाप्पाला दणक्यात निरोप देण्यासाठी अनेक ठिकाणी उत्साहात बाप्पाची विसर्जन मिरवणूक सुरू आहे. काही छोट्या मंडळाच्या
बाप्पांचे विसर्जन पण झाले आहे. पुण्यातील मानाचा पहिला कसबा गणपतीचा विसर्जन सोहळा पार पडला आहे.
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपतीचे दुपारी ४.१८ मिनिटांनी नदीपात्रातील पतंगा घाटात विसर्जन करण्यात आले. त्यानंतर मानाच्या दुसऱ्या
तांबडी जोगेश्वरी मित्र मंडळाच्या गणपतीचे ५.३६
मिनिटाला विसर्जन नदीपात्रातील पतंगा घाटात
करण्यात आले. त्यानंतर मानाच्या तिसऱ्या गुरुजी तालीम मित्र मंडळाच 7.24 मिनिटांनी विसर्जन करण्यात आले.
मंडळाच्या वतीने या वर्षी मिरवणुकीमध्ये नादब्रह्म
व शिवमुद्रा पथकांचे आयोजन केली होते.
मंडळाच्या वतीने विठ्ठल रुक्मिणी रथ तयार करण्यात आला. आकर्षक फुलांची आरास केलेल्या रथावर बाप्पांची सुंदर मूर्ती विसर्जन मार्गावर मार्गस्थ झाली.
यावेळी कार्यकर्त्यांनी दरवर्षीप्रमाणे गुलालाची उधळण केली.
यावेळीगुरुजी तालीम मित्रमंडळाचे अध्यक्ष प्रवीण परदेशी
व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply