Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

मानाच्या चौथ्या तुळशीबाग मित्र मंडळाचे मंडळाचे ८.०२ मिनिटांनी विसर्जन


पुणे: आज अनंत चतुर्दशी म्हणजेच आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्याचा दिवस आहे. यामुळे राज्यभरात गणेशाचे विसर्जन करण्यास सुरुवात झाली आहे.
यानिमित्ताने बाप्पाला दणक्यात निरोप देण्यासाठी अनेक ठिकाणी उत्साहात बाप्पाची विसर्जन मिरवणूक सुरू आहे. काही छोट्या मंडळाच्या
बाप्पांचे विसर्जन पण झाले आहे. पुण्यातील मानाचा पहिला कसबा गणपतीचा विसर्जन सोहळा पार पडला आहे.
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपतीचे दुपारी ४.१८ मिनिटांनी नदीपात्रातील पतंगा घाटात विसर्जन करण्यात आले. त्यानंतर मानाच्या दुसऱ्या
तांबडी जोगेश्वरी मित्र मंडळाच्या गणपतीचे ५.३६
मिनिटाला विसर्जन नदीपात्रातील पतंगा घाटात
करण्यात आले. त्यानंतर मानाच्या तिसऱ्या गुरुजी तालीम मित्र मंडळाच 7.24 मिनिटांनी विसर्जन करण्यात आले. त्यानंतर मानाचा चौथा तुळशीबाग गणपती मंडळाचे ८.०२ मिनिटांनी विसर्जन करण्यात आले.
तुळशीबाग गणपती मित्र मंडळाची मिरवणूक नगारा वादन व भव्य रथात काढण्यात आली. तुळशीबाग गणपतीच्या मिरवणुकीमध्ये गजलक्ष्मी, स्वरूप वर्धिनी पथक उपस्थित होते.
यावेळी तुळशीबाग मित्र मंडळाचे अध्यक्षनितीन पवार विकास पासलकर व मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
.

.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading