मानाच्या पाचव्या केसरी वाडा मंडळाचे ८.४७ मिनिटांनी विसर्जन
पुणे: आज अनंत चतुर्दशी म्हणजेच आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्याचा दिवस आहे. यामुळे राज्यभरात गणेशाचे विसर्जन करण्यास सुरुवात झाली आहे.
यानिमित्ताने बाप्पाला दणक्यात निरोप देण्यासाठी अनेक ठिकाणी उत्साहात बाप्पाची विसर्जन मिरवणूक सुरू आहे. काही छोट्या मंडळाच्या
बाप्पांचे विसर्जन पण झाले आहे. पुण्यातील मानाचा पहिला कसबा गणपतीचा विसर्जन सोहळा पार पडला आहे.
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपतीचे दुपारी ४.१८ मिनिटांनी नदीपात्रातील पतंगा घाटात विसर्जन करण्यात आले. त्यानंतर मानाच्या दुसऱ्या
तांबडी जोगेश्वरी मित्र मंडळाच्या गणपतीचे ५.३६
मिनिटाला विसर्जन नदीपात्रातील पतंगा घाटात
करण्यात आले. त्यानंतर मानाच्या तिसऱ्या गुरुजी तालीम मित्र मंडळाच 7.24 मिनिटांनी विसर्जन करण्यात आले. त्यानंतर मानाचा चौथा तुळशीबाग गणपती मंडळाचे ८.०२ मिनिटांनी विसर्जन करण्यात आले. त्यानंतर मानाचा पाचवा केसरी वाडा गणपतीचे ८.४७ मिनिटांनी विसर्जन करण्यात आले.
केसरी वाडा गणपती मित्र मंडळाची मिरवणूक
फुलांनी सजवलेल्या मेघडंबरी रथातून मानाचा पाचवा गणपती केसरीवाडा मिरवणुकीत सहभागी झाला. श्रीराम शिवमुद्रा, वज्र या ढोल-ताशा पथ मिरवणुकीत सहभागी होते.
केसरी वाडा मित्र मंडळाचे अध्यक्ष रोहित टिळक, गिताली टिळक व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
.
.
