Thursday, June 18, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

कसबा गणपती – मानाच्या पहिल्या गणपतीचे ४.१८ मिनिटांनी विसर्जन

पुणे: आज अनंत चतुर्दशी म्हणजेच आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्याचा दिवस आहे. यामुळे राज्यभरात गणेशाचे विसर्जन करण्यास सुरुवात झाली आहे.
यानिमित्ताने बाप्पाला दणक्यात निरोप देण्यासाठी अनेक ठिकाणी उत्साहात बाप्पाची विसर्जन मिरवणूक सुरू आहे. काही छोट्या मंडळाच्या
बाप्पांचे विसर्जन पण झाले आहे. पुण्यातील मानाचा पहिला कसबा गणपतीचा विसर्जन सोहळा पार पडला आहे.
शहरातील विसर्जन मिरवणूक मार्गावर कसबा गणपती आल्यानंतर इथे बेलगाम चौकात मुस्लिम बांधवांनी कसबा गणपतीच्या पालखीचे सारथ्य केले. तसेच लहान मुलांसाठी लाठी-काठी आणि तलवार बाजी प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. द
कसबा गणपतीच्या मिरवणुकीमध्ये
रमणबाग बरोबरच रुद्रगर्जना आणि कलावंत ही ढोल पथके मिरवणुकीत सहभागी झाली होती.
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपतीचे दुपारी ४.१८ मिनिटांनी नदीपात्रातील पतंगा घाटात विसर्जन करण्यात आले.
यावेळी नागरिकांचा व कार्यकर्त्यांचा गणपती बाप्पा मोरयाच्या जय घोषात उत्साह दिसून आला.
यावेळी कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading