Tuesday, October 27, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

दसरा मेळाव्याचा खरा मान हा बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनाचा -अजित पवार


पुणे:यंदाचा दसरामेळावा शिंदे गट का शिवसेना करणार याचा निर्णय अजून कोर्टात बाकी आहे. त्यावर दसरा मेळाव्याचा खरा मान हा बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनाचा असून त्यांचे नेतृत्त्व करणाऱ्या उद्धव ठाकरे यांचाच आहे. माझी उपमुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते अजित पवार पुण्यात पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
अजित पवार म्हणाले, होणाऱ्या दसऱ्या मेळाव्याचा शिवसैनिक साथ देतील ती उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेलाच असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी भाजपकडून बारामती मतदार संघासाठी मोर्चेबांधणी करण्याचे काम सुरु केले आहे, त्याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, भाजपच्या त्यांच्या कामाला आमच्या शुभेच्छा असल्याचे सांगत भाजप पक्षालाही त्यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या.
राज्यातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीबाबत सरकार काय मदत जाहीर करणार याची माहिती घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दोन दिवसापूर्वी पुण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा होता. यावेळी ते उशिरा आले होते, हाच धागा पकडून अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना शिंदे आणि माध्यमांना टोला लगावला. अजित पवार म्हणाले, “एकनाथ शिंदे परवा पुण्यात आले तेव्हा उशिरा आले, मला, तुम्ही लवकर आलात असा प्रश्न विचारला असता.आमचा वेळ महत्त्वाचा असतो तसा बाकीच्यांना पण वेळ महत्त्वाचा असतो. असे अजित पवार म्हणाले.

Leave a Reply