Saturday, June 20, 2026
Latest NewsPUNE

हसायचे कशासाठी ? हसायाचे निरामय आयुष्यासाठी…

पुणे : माणसाकडे कितीही सोयी सुविधा असल्या तरी रोजच्या जीवनातले टेन्शन कमी होण्याऐवजी वाढतच राहत. हे टेन्शन कमी करण्याचा एकमेव उपाय म्हणजे हसणे…..हसणे हा जसा आनंद देणारा आहे तसाच तो मनाची मशगत करून आयुष्य निरामय करणार प्रकार आहे. हसणे ही केवळ एक प्रक्रिया नाही तर तो शास्त्रिय (सायन्टेफिक) प्रकार आहे, अशा शब्दात रोजच्या जीवनात हसण्याचे महत्व आज

३४ व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये हयासदान फाऊंडेशनने हास्योत्सव एकपात्रींचा हा कार्यक्रम आयोजित केला होता. बालगंधर्व रंगमंदीरात झालेल्या या कार्यक्रमात पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांनी कार्यक्रम आयोजित करणा-या मकरंद टिल्लू, मंजिरी धामणकर, चैताली माजगावकर – भंडारी, दिलीप हल्याळ आणि महेंद्र गणपुले या हास्यवीरांचा सन्मान केला आणि कार्यक्रमाचा आनंदही घेतला. यावेळी फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मुख्यसंयोजक डॉ. सतीश देसाई, सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख मोहन टिल्लू, श्रीकांत कांबळे. यावेळी उपस्थित होते. बाहेर जोरात पाऊस कोसळत असतानाही बालगंधर्व रंगमंदीरात हास्यप्रेमीनी गर्दी करून हास्याची कारंजी उडवली.

कार्यक्रमाची सुरूवात मकरंद टिल्लू यांनी पापड असो की माणसं पावसळ्यात कोमजतातच, पण कार्यक्रमाला गर्दी महत्वाची नसते तर दर्दी महत्वाचे असतात असे सांगून पहिलीच टाळी घेतली.  मंजिरी धामणकर यांनी सूत्रसंचलनाची सूत्रे घेतानाच ‘तुम्हारे घर कि शान न जाती की रूदबा कम हो जाता, जो गुस्से कहाँ तुमने वो हसके कह जाता.’असा शेर ऐकवत सुरूवात केली. हास्य ही फक्त माणसालच मिळालेली दैवी देणगी असल्याचे स्पष्ट करताना प्राण्यांना कधी हसताना बघितले का ? जर प्राणीही हसू शकले असते तर…? असा मिश्किल प्रश्न केला. त्यानंतर त्यांनी काही किस्से सांगितले.

आपल्या सनी बरोबर चैताली माजगावकर हिने थेट प्रक्षागृहातून एन्ट्री केली. तिने रामदास पाध्येंसारखी शब्दभ्रम ही कला अवगत केली आहे. सनी सोबत तिने गप्पा मारल्या अन सर्वांनाच पाध्येंच्या बोलक्या बाहुल्यांची आठवण झाली.

दिलीप हल्याळ यांनी करोनाचा चॅप्टर सर्वांनी विसरून जावा यासाठी आपण बंपर लाफ्टर घेऊन आलो आहे असे सांगून पहिल्या वाक्यापासून रसिकांची दाद मिळवली. अनेक विनोद रोजच्या जीवनात आपल्या आजूबाजूला घडत असतात. ते कसे टिपायचे याचे रोजच्या जीवनातील अनेक दाखले त्यांनी दिले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading