Saturday, June 20, 2026
Latest NewsPUNE

‘व्हॉईस ऑफ पुणे फेस्टिवल’मध्ये तरुणांबरोबरच वयस्कर स्पर्धकांचाही उस्फूर्त सहभाग

पुणे : ३४व्या पुणे फेस्टिवल अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या ‘व्हॉईस ऑफ पुणे फेस्टिवल’ हिंदी सुगम संगीत / चित्रपट गीत स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये राज्याच्या विविध भागातून आलेल्या तरूणांपासून चाळीशी ओलंडलेल्या महिला आणि पुरुषांनी सादर केलेल्या एकापेक्षा एक सरस गीतांनी रासिकांना तृप्त केले. तरुणाई बरोबरच चाळीशी ओलांडलेल्या महिला आणि पुरुष स्पर्धकांच्या उत्साहाने रसिक भारावून गेले. यंदाचे वर्षी ही पुणे, मुंबईसह नगर, बीड अशा ठिकाणांहून स्पर्धक आले होते.

संगीत विशारद, पं. किरण परळीकर, डॉ. विद्याताई गोखले, संगीत विशारद सौ. सीमाताई येवलेकर व झी सारेगमपचा प्रथम विजेता व आजचा नामवंत गायक मंगेश बोरगांवकर अशा ४ शास्त्रीय संगीत विशारद व तसेच सुगम संगीतामधील तज्ञ परिक्षकांनी परिक्षण केले.

सूर, ताल, प्रेक्षकांचा प्रतिसाद, व सादरीकरण अशा प्रमाणे विभागून गूण दिले गेले. १६० स्पर्धेकांमधून एकूण ३० स्पर्धक अंतिम फेरीसाठी निवडले गेले. अंतीम फेरी दि. ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० वा. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये वाद्यवृदांसहित संपन्न झाली. पुणे फेस्टिवलचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या स्पर्धेच्या अंतिम फेरीला प्रारंभ झाला. यावेळी या स्पर्धेच्या संयोजक अॅड. अनुराधा भारती, प्रसिद्ध मराठी चित्रपट निर्माते व या स्पर्धेचे बक्षीस प्रायोजक निलेश नवलाखा, हाँटेल राजेशाहीचे निलेश दमीष्टे, परीक्षक मंगेश बोरगावकर, पं. किरण परळीकर आणि अतुल गोंजारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुत्र संचालन अॅड. अनुराधा भारती व उमेद पाटील यांनी केले.

निकाल 

४० वयोगटाखाली महिला

प्रथम पारितोषिक – डाँ.अनघा गुमास्ते,

द्वितीय पारितोषिक – प्रणीती परबत,

तृतीय पारितोषिक – प्रतीक्षा डुडे,

उत्तेजनार्थ – सुझी मँथ्यू

 

४० वयोगटावरील महिला

प्रथम पारितोषिक-किशोरी तांबोळी

द्वितीय पारीतोषिक-रोशन शेख

तृतीय पारितोषिक-जिना शहा,

उत्तेजनार्थ-दुर्गा नगरकर

 

४० वयोगटाखालील पुरूष

प्रथम पारितोषिक- राहुल दुधवडे

द्वितीय पारितोषिक- अजिंक्य देशपांडे,

तृतीय पारितोषिक- अमेय तळणीकर

उत्तेजनार्थ- प्रतिक चोखंदरे

 

४० वयोगटावरील पुरूष

प्रथम पारितोषिक- डॉ. अजय नितुरकर,

द्वितीय पारितोषिक -प्रमोद शेजवलकर,

तृतीय पारितोषिक- विजय खापेकर

उत्तेजनार्थ- निरंजन मागीकर

 

सर्वोत्तम सादरीकरण

‘व्हॉईस ऑफ पुणे फेस्टिवल’(महिला)- रोशन शेख

‘व्हॉईस ऑफ पुणे फेस्टिवल’ (पुरुष)- राहुल दुधवडे

 

 

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading