मुंबईत आम्हाला उपमहापौर पद मिळावे – रामदास आठवले
पुणे : मुंबई मनपा निवडणुकीत बहुमताने युती विजयी होईल. भाजप आणि शिंदे गट यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहे. मुंबई मध्ये आम्हास पुण्याप्रमाणे उपमहापौरपद मिळावे आणि जर आरक्षण पडले तर महापौर पद मिळावे अशी मागणी रिपब्लिकन पक्ष प्रमुख रामदास आठवले यांनी केली आहे.
रामदास आठवले म्हणाले,पहिला महापौर आमचा चंद्रकांत हांडोरे मुंबईत काँग्रेस सोबत युतीत असताना झाला होता. अनेक ठिकाणी आम्हास भरभरून यश मिळेल. आघाडी सरकार सत्तेतून गेल्याने लोक आनंदात आहेत, युतीचे सरकार पडणार आहे आणि अडीच वर्ष सरकार टिकेल. त्याचसोबत पुढील पाच वर्ष ही आम्ही सत्तेत येऊ असे मत रामदास आठवले यांनी व्यक्त केले.
शिवसेनेत दोनच गट आहे मात्र आमच्यात अनेक गट पडलेले आहे. आमच्यात ऐक्य होत असेल तर मी त्यास तयार आहे. शिवसेनेची अवस्था आरपीआय सारखी करण्याची आमची तयारी आहे. शेकडो गटमुळे आमच्या समाजाची अवस्था क्षीण झाली आहे. आमचा सर्वात प्रभावशाली गट असूनही आमदार, खासदार निवडून आणण्याची ताकद अद्याप आमच्यात नाही.असंही ते म्हणाले
