निवडणुकांमध्ये भाजपाला दूर ठेवण्यासाठी आम्ही महाविकास आघाडी म्हणून काम करीत आहोत – बाळासाहेब थोरात
पुणे: काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी आज मानाचा पहिलं गणपती कसबा गणपतीची आरती केली.
यावेळी त्यांच्यासोबत माजी आमदार मोहन जोशी, काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी आमदार दीप्ती चवधरी, जेष्ठ काँग्रेस नेते उल्हास पवार, अनंत गाडगीळ , प्रशांत सुरसे, काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे, माजी महापौर कमल व्यवहारे, नगरसेवक आबा बागुल व काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
बाळासाहेब थोरात म्हणाले,आज देखील महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही आहोत.आमच्या बैठका देखील एकत्रित होत असतात. तसेच आगामी काळात होणार्या निवडणुकांमध्ये भाजपाला दूर ठेवण्यासाठी आम्ही महाविकास आघाडी म्हणून काम करीत आहोत आणि कार्यक्रम घेत आहे. असे बाळासाहेब थोरात म्हणाले.
शिवसेनेतील बंडखोरीनंतर खरी शिवसेना कोणती? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. शिंदे गटाकडून वारंवार नवनवे दावे केले जात आहे. पक्षाच्या गटनेतेपदापासून सुरु झालेले दावा थेट पक्षचिन्हापर्यंत येऊन थांबले.सध्या शिवसेनेच्या अस्तित्वाची लढाई सर्वोच्च न्यायालयात आहे.
अशातच आता शिंदे गट शिवसेनेचा दसरा मेळावाही हायजॅक करण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यावर बाळासाहेब थोरात म्हणाले,,या राजकारण्याच्या बाबी होण्याची गरज नाही.ज्यांनी दसरा मेळाव्याची सुरुवात केली आहे.त्यांनाच संधी मिळाली पाहिजे.
बाळासाहेब थोरात म्हणाले,भाजप ज्या पद्धतीने पुढे जात आहे.सत्ता काही झाली तरी आम्हाला पाहिजे हेच त्यांच ध्येय झाल आहे. कर्नाटक,मध्यप्रदेश या राज्यात भाजपने कशी सत्ता मिळवली.हे सर्वांना माहिती असून आपल्या राज्यात देखील कशी सत्ता मिळवली. लोकशाहीला अभिप्रेत नाही आणि सत्तेसाठी काहीही हीच पद्धत भाजपची आहे.त्यामुळे कालच्या अमित शाह यांच्या भाषणा मधुन तेच दिसून आले आहे. असे बाळासाहेब थोरात म्हणाले.
