Wednesday, June 17, 2026
Latest NewsLIFESTYLE

Pune Festival – साक्षी पाटील ठरली यंदाची मिस पुणे फेस्टिव्हल

पुणे:यंदाच्या ३४व्या मिस पुणे फेस्टिव्हलमध्ये साक्षी पाटील ही मिस पुणे फेस्टिव्हलची मानकरी ठरली असून मानसी ताम्बोळे आणि भाविका अडसुळे या क्रमांक १ व २ रनरप ठरल्या आहेत. दि. ६ सप्टे. रोजी श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे या कार्यक्रम संपन्न झाला. याशिवाय बेस्ट ग्लोइंग स्किन – सिद्धी गांधी, बेस्ट स्माइल – शुभश्री बोरठाकूर, बेस्ट टॅलेंट – उर्वी शाह, बेस्ट फिटनेस मॉडल – कुमुदनी पाटील आणि मिस फोटोजेनिक – भाविका अडसुळे यांची निवड ही करण्यात आली.

यावेळी पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष सुरेश कलमाडी, सौ. मीरा कलमाडी, प्रदेश कॉंग्रेस उपाध्यक्ष रमेश बागवे, सौ. … बागवे, पुणे फेस्टिव्हल उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मुख्य संयोजक डॉ. सतीश देसाई, काका धर्मावत, मोहन टिल्लू, संतोष उणेचा, दीपाली पांढरे, संयोगिता कुदळे, तेजश्री अडीगे, संयोजिका सुप्रिया ताम्हाणे आणि शो डायरेक्टर जुई सुहास आदी उपस्थित होते. बॉयज ३ या नव्या मराठी चित्रपटाची टीम यावेळी आवर्जून उपस्थित होती. त्यामध्ये अभिनेते पार्थ भालेराव, प्रतिक लाड, सुमंत शिंदे, विदुला चौगुले व दिग्दर्शक विशाल देवरुखकर उपस्थित होते. त्याचा ट्रेलर ही यावेळी दाखवण्यात आला.

मिस पुणे फेस्टिव्हल ही देशामध्ये आकर्षण बनलेली आणि तरुणींमध्ये लोकप्रिय असलेली स्पर्धा बनली आहे. स्पर्धेचे यंदाचे ८ वे वर्ष आहे. ही महिलांचे व्यक्तिमत्व आणि सौंदर्य या बरोबरच कुटुंब व समाजाबद्दलचा दृष्टीकोन, प्रेझेंटेशन अशा विविध पातळ्यांवर घेतली जाते. १८ ते २५ वर्षे वयोगटातील १५० युवतींनी यामध्ये भाग घेतला होता त्यातून अंतिम फेरीसाठी २० तरुणींची निवड करण्यात आली. अंतिम फेरीत ३ भाग असून पहिल्या फेरीत लेहेंगा, साडी, घाघरा (एथनिक) अशी वेशभूषा होती. श्वेता दरेकर यांनी याचे एथनिक डिझाईन केले होते. या तरुणींनी स्वपरीचय करून दिल्यानंतर दुसऱ्या भागात समूहनृत्य झाले. त्यासाठी पार्टीवेयर टॉप ही वेशभूषा होती. हे वेस्टर्न आउटफिट्स मनस्मी यांचे होते. यातून अंतिम फेरीसाठी 10 तरुणींची निवड करण्यात आली.

या अंतिम फेरीसाठी लेबल सोनाली सावंत यांची गाऊन डिझाईन ही वेशभूषा होती. प्रशोत्तरानंतर १० जणींतून तिघींची निवड ज्युरींनी केली. या वेळी रीदम डान्स अकादमीच्या कलावंतांनी नृत्य सादर केली. चेतन अगरवाल यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. यावेळी या स्पर्धेतून पुढे चमकलेल्यांपैकी मिस स्कुबा इंटरनॅशनल वर्षा राजखोवा, इशा हुबळीकर, स्नेह भालेराव आणि शारावी पोमण यांचा सेलिब्रिटी परफॉर्मेंस सादर झाला. फैशन अँड डांस कोरियोग्राफर, ग्रूमिंग मेंटर, शो डायरेक्टर आणि कॉस्टयूम स्टाइलिस्ट जुई सुहास यांनी सर्व महिला स्पर्धकांची पूर्वतयारी व प्रशिक्षण याचे मार्गदर्शनकरून घेतले होते. सुप्रिया ताम्हाणे यांनी याचे संयोजन केले. ज्वेलरी – बाळासाहेब अमराळे, हेयर एंड मेकअप – आयएसएएस, क्राऊन – गजानन ज्वेलर्स, ऑफिशियल डिझाईनर – धागा हे होते. कोहिनूर ग्रुप याचे मुख्य प्रायोजक आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading