Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNE

Pune Festival – ‘उगवते तारे’ रौप्य महोत्सव

पुणे:उगवत्या व नवोदित कलाकारांसाठी पुणे फेस्टीव्हलमध्ये दरवर्षी ‘उगवते तारे’ या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. ३४व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये मंगळवार दि. ६ सप्टे. रोजी सायं. पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन, पुणे येथे झालेल्या उगवते तारे कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ भरतनाट्यम नृत्यांगना आणि नृत्यगुरू डॉ. स्वाती दैठणकर यांचा हस्ते संपन्न झाले. प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद यास मिळाला. यंदा या उपक्रमाचे २५वे वर्ष आहे. रवींद्र दुर्वे याचे संयोजन करीत आहे.

५ ते १५ वर्षे वयोगटातील उगवत्या कलाकारांना व्यासपीठ मिळवून देणाऱ्या या कार्यक्रमात यंदा १५० हून अधिक बाल कलाकारांनी सहभाग घेतला. शास्त्रीय गायन, शास्त्रीय नृत्यामध्ये ; कथक, भरतनाट्यम, मोहिनीअट्टम, कथकली, कुचीपुडी व ओडिसी नृत्य तसेच तबला, बासरी, हार्मोनियम, गिटार, व्हायोलीन, सतार, सरोद, कीबोर्ड वादन, सिंथेसायझर, गंधर्व गायन, नकला, एकपात्री प्रयोग, जादूचे प्रयोग, पोवाडे, भावगीत, भक्तीगीत, चित्रपट गीते, सुगम संगीत, पाश्चिमात्य नृत्य अशा वैविध्यपूर्ण कला प्रकारांनी सारे भवन भारून गेले होते. प्रारंभी उगवते तारे कार्यक्रमाचे संयोजक रवींद्र दुर्वे यांनी सर्वांचे स्वागत केले. उद्घाटक डॉ. स्वाती दैठणकर यांनी बाल कलाकारांना शुभेचा दिल्या आणि कौतुक करून म्हंटले ‘की पुणे फेस्टिव्हल सारखे सांस्कृतिक महोत्सवात उगवते तारे हा उपक्रम गेली 25 वर्षे चालू आहे याबद्दल अध्यक्ष सुरेश कलमाडी आणि संयोजक रवींद्र दुर्वे यांचे अभिनंदन करायला हवे’. ‘हा टॅलंट सर्च आहे’ असे ही त्या म्हणाले.

पुणे फेस्टिव्हलचे मुख्यप्रायोजक कोहिनूर ग्रुप असून उपप्रायोजक जमनालाल बजाज फाउंडेशन,नॅशनल एग को-ऑर्डिनेशन कमिटी, सिस्का आणि सहप्रायोजक भारत फोर्ज व पंचशील आहेत. उगवते तारेचे प्रयोजक मराठी बांधकाम व्यावसयिक संघटना व गेरा डेवलपमेंट प्रा.लि हे आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading