Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNE

डी.ई.एस.सेकंडरी शाळेत विद्यार्थी शिक्षक

पुणे: डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. टिळक मार्ग येथील डी.ई.एस.सेकंडरी शाळेत शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
डी.ई.एस. सेकंडरी शाळेत शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थी शिक्षक झाले. मी शिक्षक झालो तर , मी शिक्षिका झाले तर… असे निबंध परीक्षेच्या पेपरमध्ये लिहायला येतात. याची प्रत्यक्ष अनुभूती इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांनी घेतली. या विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या भूमिकेत पहिली ते नववीच्या वर्गात विविध विषयांचे तास घेतले.आपल्या शाळेतील मित्रांना शिक्षक होऊन शिकवले. या तासांमध्ये सामान्य ज्ञान, विविध मनोरंजक खेळांचाही समावेश होता. शिक्षक होऊन विद्यार्थ्यांना शिकवण्याचा आनंद दहावीतील विद्यार्थ्यांनी घेतला. या विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता,
“ शिक्षक होऊन शिकवणे अत्यंत जबाबदारीचे काम असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शिक्षकांबद्दलची कृतज्ञताही व्यक्त केली.” शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती विनायक बोधे, पर्यवेक्षिका विजया जोशी, शिक्षिका लक्ष्मी मालेपाटी शिक्षक, शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. शिक्षक दिनाच्या कार्यक्रमासाठी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading