Thursday, June 18, 2026
Latest NewsLIFESTYLE

जंपिन हाईट्स देणार साहसी खेळांचा उत्कृष्ट अनुभव

पणजी  : गोव्यामध्ये समुद्रकिनाऱ्यांव्यतिरिक्त इतर सौंदर्यांचा आनंद घेण्याची इच्छा असेल तर उत्तर गोव्यात मधोमध असलेल्या जंपिन हाईट्सला नक्की भेट द्या. मायेम तलावावर बंजी जंपचा थरार अनुभवा आणि हृदयात जपून ठेवाव्यात अशा आठवणी निर्माण करा. भारतातील आघाडीचे एक्सट्रीम ऍडव्हेंचर स्पोर्ट्स ऑपरेटर जंपिन हाईट्स आपल्या सुरक्षा मापदंडांसाठी नावाजले जातात. गोव्यातील एकमेव फिक्स्ड प्लॅटफॉर्म बंजी जवळपास १८१ फीट उंचीवर आहे. नैसर्गिक तलाव आणि हिरवेगार जंगल यामुळे हा संपूर्ण परिसर अतिशय मनोहारी आहे. हा प्लॅटफॉर्म निसर्गाच्या कुशीत आहे असे म्हटल्यास काही वावगे ठरणार नाही.

काळ्या आणि नारंगी रंगांचा हा जंप टॉवर एक अनोखे दृश्य प्रदान करतो. त्याच्या चारी बाजूंनी तलावाचे नयनरम्य भव्य दर्शन घडते. उत्तर गोव्यातील अतिशय लोकप्रिय बागा बीचपासून हे ठिकाण फक्त ३५ मिनिटांच्या अंतरावर आहे. माजी सेना अधिकाऱ्यांमार्फत संचालित या प्लॅटफॉर्ममध्ये न्यूझीलंडचे तज्ञ ट्रेंड जंप मास्टर्स असून याठिकाणी ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडमधील सुरक्षा मापदंडांचे पालन केले जाते.

गोवा पर्यटनाच्या सहयोगाने, जागतिक सुरक्षा मापदंडांसह काम करत असलेले एक्सक्लुसिव्ह बंजी लोकेशन जंपिन हाईट्स गोव्यामध्ये येऊन आनंद घेण्याचे एक लोकप्रिय डेस्टिनेशन बनले आहे. त्यामुळे तिकिटे जंपिन हाईट्सच्या वेबसाईटवर आधीच बुक करावीत. याठिकाणी जंप केल्यानंतर जंपर्स स्वतःसोबत ‘आय हॅव गॉट गट्स’ बॅज ऑफ ऑनरचे प्रमाणपत्र, आपल्या जंपचा एक एचडी व्हिडिओ आणि आयुष्यभर जपून ठेवाव्यात अशा आठवणी सोबत घेऊन जातात. याठिकाणी जंपरसोबत येणाऱ्या इतर सदस्यांसाठी एक कॅफेटेरिया देखील आहे.

जंपिन हाईट्सचे संस्थापक राहुल निगम यांनी सांगितले, “साहसी खेळांच्या शौकिनांसाठी हे स्वप्नपूर्तीचे ठिकाण आहे. आम्ही मान्सून ब्रेकनंतर १२ ऑगस्टपासून गोव्यामध्ये आमचा बंजी प्लॅटफॉर्म पुन्हा सुरु केला आहे. याठिकाणी येणाऱ्या लोकांच्या सुरक्षिततेची आम्ही काटेकोरपणे काळजी घेतो. देशात कोविडच्या केसेस जरी कमी झाल्या असल्या तरी कोविडपासून सुरक्षेच्या नियमांमध्ये आम्ही जराही ढिलाई करत नाही. सुरक्षिततेला आमची कंपनी कायम प्राधान्य देते. आम्ही सध्याच्या काळातील सर्वोत्तम आणि संस्मरणीय बंजी जंपचा अनुभव प्रदान करतो.”

उल्लेखनीय बाब अशी की, जंपिन हाईट्स ही एकमेव बंजी सुविधा आहे जिला भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने बंजी ऑपरेशनसाठी प्रमाणित करून मान्यता दिलेली आहे. २०१० मध्ये भारतीय सेनेतील माजी अधिकारी श्री. राहुल निगम यांनी स्थापन केलेली कंपनी जंपिन हाईट्सने ऋषिकेशमध्ये आपल्या जंपी झोनमध्ये गेल्या दहा वर्षात १,००,००० बंजी जंप पूर्ण केल्या आहेत. हे देशातील सर्वात उंच (८३ मीटर) बंजी जंप देखील आहे. श्री. निगम यांनी माहिती दिली आहे की, ऋषिकेशमध्ये बंजी जंप १५ सप्टेंबरपर्यंत पुन्हा सुरु होईल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading