Wednesday, June 17, 2026
BusinessLatest News

क्रोमाच्या पुणे, मुंबई, नागपूर व कोल्हापूरमधील स्टोर्समध्ये ई-वेयर गणेशाची आदरपूर्वक प्रतिष्ठापना

पुणे :  जीवनात सुधारणा घडवून आणण्यासाठी सर्वात नवीन व तंत्रज्ञानदृष्ट्या प्रगत उत्पादने घेण्याकडे ग्राहकांचा वाढता कल लक्षात घेता, टाटा समूहातील क्रोमा या भारतातील पहिल्या व विश्वसनीय ओम्नी-चॅनेल इलेक्ट्रॉनिक्स रिटेलरने जबाबदारीचे भान राखून वस्तूंचा वापर करण्याच्या संस्कृतीला चालना देण्याचे आपले प्रयत्न कायम सुरु ठेवले आहेत. यंदा गणेश चतुर्थीच्या निमित्ताने क्रोमाने नवीन आरंभाचे देवता म्हणून पूजनीय असलेल्या श्रीगणेशाचे स्वागत करण्यासाठी ग्राहकांना आमंत्रित केले आहे. जुन्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंपासून अतिशय कौशल्यपूर्वक साकार करण्यात आलेल्या अभिनव गणेश मूर्ती क्रोमाने सादर केल्या आहेत. इलेक्ट्रॉनिक वेस्टबद्दल लोकजागृती घडून यावी हा यामागचा उद्देश आहे. ख्यातनाम, निपुण कलाकारांनी अतिशय कल्पकतेने घडवलेल्या या गणेश मूर्तींची आदरपूर्वक प्रतिष्ठापना क्रोमा स्टोर्समध्ये करण्यात आली आहे.  मुंबईत प्रभादेवी व घोडबंदर रोड, पुण्यात हिंजवडी, नागपुरात आजीनी स्क्वेअर आणि कोल्हापुरात जुन्या पुणे बंगलोर मार्गावरील क्रोमा स्टोर्समध्ये ३१ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीत अनोख्या व कल्पक ई-वेयर श्रीगणेश दर्शनाचा लाभ घेता येईल. व्यवसाय आणि व्यापारापुरते मर्यादित न राहता गॅजेट्सचा वापर करताना जबाबदारीचे भान राखण्याविषयी आणि गॅजेट्सच्या पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांविषयी लोकजागृती निर्माण करणे ही यामागची संकल्पना आहे. या गणेश मूर्तींचे विसर्जन अतिशय आदरपूर्वक आणि पर्यावरणाविषयीच्या जबाबदारीचे पुरेपूर भान राखून, पर्यावरणस्नेही पद्धतीने जस्टडिस्पोज या ई-डिस्पोजल तज्ञांच्या सहयोगाने करण्यात येणार आहे.

कलाकार हरिबाबू नातेसन यांनी पुण्यातील हिंजवडीमधील ई-वेयर मूर्ती तयार केली आहे.

याबरोबरीनेच क्रोमाने ई-वेस्ट कलेक्शन मोहीम देखील आयोजित केली आहे. ई-वेस्ट डिस्पोजल तज्ञांच्या सहयोगाने ३१ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२२ दरम्यान मुंबई, पुणे आणि अमरावतीमधील २०-२५ निवासी सोसायट्यांमध्ये ही मोहीम राबवली जाणार आहे. ई-वेस्टची विल्हेवाट पर्यावरणस्नेही पद्धतीने केली जावी आणि गॅजेट्सचा वापर जबाबदारीचे भान राखून करण्याच्या संस्कृतीला चालना दिली जावी हा या मोहिमेमागचा उद्देश आहे.  या मोहिमेत सहभागी झाल्याच्या समाधानाचे प्रतीक म्हणून प्रत्येक व्यक्तीला एक ई-प्रमाणपत्र देण्यात येईल.

नवनवीन, प्रगत डिव्हायसेस विकत घेऊन अपग्रेड करण्याची इच्छा लोकांमध्ये प्रबळ होत चालली आहे.  दरवर्षी नवी व प्रगत डिव्हायसेस विकत घेतली जातात व जुनी डिव्हायसेस टाकून दिली जातात.  वापरात नसलेल्या डिव्हायसेसचे करायचे काय हा प्रश्न आजकाल प्रत्येकाला सतावत असतो. ही समस्या सोडवण्यामध्ये आपल्या ग्राहकांची मदत करण्याचे क्रोमाने ठरवले असून त्यासाठी ई-वेस्टची सुरक्षित व पर्यावरणस्नेही पद्धतीने विल्हेवाट लावण्याच्या विषयातील तज्ञ जस्टडिस्पोज यांच्या सहयोगाने जुन्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची विल्हेवाट लावण्याचे काम क्रोमाने हाती घेतले आहे.  ग्राहकांनी ई-वेस्टची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावल्याबद्दल क्रोमातर्फे त्यांच्या नावाने एक झाड लावले जाते. नुकताच क्रोमाने ख्यातनाम कलाकारांच्या सहयोगाने आपल्या काही स्टोर्समधील ई-वेस्ट बीन्सचा मेकओव्हर केला. हे ई-बीन्स भारतभरातील क्रोमा स्टोर्समध्ये संपूर्ण वर्षभर ठेवण्यात येतील.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading