Saturday, June 20, 2026
ENTERTAINMENTLatest News

दगडीचाळ थिमवर साकारलेला गणपती देखावा ठरला चर्चेचा विषय….

जयघोष ऐकोनि तुझा देवा जाहली कर्णरंध्रे मुग्ध नि गोड कर जोडुनी उभा द्वारी लागली तुझ्या आगमनाची ओढ. सगळीकडे बाप्पाच्या आगमनाची जोरदार तैयारी चालू आहे. गेल्या २ वर्षात लॉकडाऊन मुळे कोणताच सण साजरा करता आला नाही. गेल्या २ वर्षाची पूर्ण कसर यंदा भरून निघणार असा एकंदर चित्र दिसत आहे. गणपती उत्सव म्हटलं कि सजावट, फुलांची आरास, देखावे, रांगोळी हे मनमोहक दृश्य आपल्याला पाहायला मिळते.

देखावे हे जितके सुंदर आपल्याला दिसतात तितकीच मेहनत ते देखावे बनवताना लागते. असाच एक आगळा वेगळा गणपती देखावा अनुष्का पाटील हिने साकारला. आगळा वेगळा म्हणजे नक्की कसा? हा प्रश्न पडलाय ना तुम्हाला. नुकताच प्रदर्शित झालेल्या मंगलमूर्ती फिल्म्स आणि संगीता अहिर निर्मित, कार्यकारी निर्माते रत्नकांत जगताप व चंद्रकांत कणसे दिग्दर्शित सुपरहिट ‘दगडीचाळ २’ साठी चित्रपटगृहात प्रेक्षकांची रांग लागली असून चित्रपट सुपरहिट ठरत आहे. या चित्रपटाने घराघरात लोकांच्या मनावर छाप पाडली आहे. अंकुश चौधरी, पूजा सावंत, मकरंद देशपांडे यांची या चित्रपटात प्रमुख भूमिका आहे. अनुष्काने यंदा चक्क दगडीचाळीचा देखावा बनवला. या देखाव्याबद्दल अनुष्का खूपच उत्सुक दिसली. अंकुश चौधरीची प्रचंड मोठी फॅन असल्याचा तिने सांगितलं. ‘दगडीचाळ २’ हा चित्रपट अनुष्काला फार आवडला आणि म्हणूनच तिने ही आगळी वेगळी थिम निवडली असल्याचा सांगितलं.

या फॅनगर्ल अनुष्का बद्दल अंकुश चौधरी म्हणतात, “प्रेक्षकांचं हे प्रेम मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. अनुष्काने खरंच खूप सुंदर असा दगडीचाळीचा देखावा मांडला. ‘दगडीचाळ २’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा इतका मोठ्या प्रमाणात प्रतिसाद पाहून मन आनंदाने भरून आलं आहे. अनुष्काला आणि माझ्या सर्वच रसिक प्रेक्षक वर्गाला खूप खूप धन्यवाद. बाप्पाचा आशीर्वाद आणि तुम्हा सर्व प्रेक्षकांच प्रेम असच पाठीशी राहो अशी आशा करतो.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading