Monday, June 22, 2026
Latest NewsPUNE

मनोज आखरे यांच्या वाढदिवसानिमित्त संभाजी ब्रिगेड तर्फे फळ व खाऊचं वाटप


पुणे:संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष शिवश्री मनोजदादा आखरे यांच्या जन्मदिनानिमित आव्हाळवाडी येथील अनाथालयातील लहान मुलांना व ज्येष्ठ नागरिकांना फळ व खाऊचं वाटप करण्यात आले, तसेच संस्थेतील मुलांना व ज्येष्ठांना गोड जेवणाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी संभाजी ब्रिगेड चे पुणे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे, शिवव्याख्याते शेखर पाटील, जिल्हा उपाध्यक्ष रणजित बिराजदार, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष जयदीप रणदिवे, सोशल मिडिया उपाध्यक्ष अशोक फाजगे, वाहतुक आघाडी उपाध्यक्ष विजय कदम, संदीप मोरे आदी उपस्थित होते, संभाजी ब्रिगेडचे लाडके अध्यक्ष मा. मनोजदादा आखरे यांचा वाढदिवस दरवर्षी प्रमाणे याही वर्षी अनाथालय येथे उत्साहात साजरा करण्यात आला.अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे यांनी दिली

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading