शिंदे गटाने दसरा मेळावा घ्यावा अशी आमची इच्छा – शिवाजीराव आढळराव पाटील
पुणे: दोन वर्षानंतर राज्यात गणपतीचा उत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे. सामान्य नागरिक ते वेगळ्या पक्षातील नेते वेगवेगळ्या मंडळांना भेट देऊन आरती व भेट देत आहेत. आज पुण्यात पहिला मानाचा गणपती कसबा गणपती ची शिंदे गटाचे नेते व शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दर्शन घेऊन आरती केली. यावेळी त्यांच्याबरोबर परिवारातील सदस्य उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
दसरा मेळावा हा शिंदे गट का शिवसेना करणार याची उत्सुकता राज्यातील जनतेला लागली आहे. सगळ्यांना त्यामुळे राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यावर विविध नेत्यांनी प्रतिक्रिया सुद्धा दिल्या आहेत.शिंदे गटानी दसरा मेळावा हा करावा अशी आमची इच्छा आहे.
जो काही दसरा मेळाव्या बाबत निर्णय होईल तो चांगला व्हावा. असे शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समन्वक आशिष कुलकर्णी यांच्या घरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांची भेट झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे अशोक चव्हाण व काँग्रेसचे नेते भाजपमध्ये प्रवेश करणार का अशी चर्चा आहे. त्यावर शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले या बातम्या मी देखील ऐकत असून शिंदे गट मजबूत व्हावा अशी इच्छा आहे. त्याच बरोबर मी दरवर्षी गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी येत असून मला बाप्पाकडे काही मागावं लागत नाही असं देखील आढळराव म्हणाले. त्याच बरोबर मला पक्षाकडे काही मागावं लागलं नसून विकासनिधी पलीकडे मी काही मागितलं नाही असं देखील आढळराव पाटील यावेळी. म्हणाले
